तिळापुर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 298 जयंती उत्साहात साजरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान तसेच रुद्रा न्यूज वजन क्रांती न्यूज मुख्य संपादक नारायण चोरमले यांना समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार पार पडला.

राहुरी तालुक्यातील तिळापुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील तरुणांनी जयंतीचे उत्तम नियोजन केले प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची व कार्याची माहिती जेष्ठ नागरिक नामदेव गरदरे, हिरालाल जाधव तसेच इतर नागरिकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच तिळापुर ग्रामपंचायत मध्ये देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 298 जयंती साजरी करण्यात आली तसेच महाराष्ट्र शासन आदेशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सौ वृशाली विष्णू जाधव, सौ शितल ज्ञानेश्वर कोळेकर यांना सन्मान चिन्ह देऊन पाचशे रुपये प्रत्येकी चेक देऊन गौरवण्यात आले.
तसेच महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा युवाशक्ती समाज रत्न पुरस्कार प्राप्त तिळापुर येथील रुद्रा न्यूज डिजिटल मीडिया व जनक्रांती न्यूज चे मुख्य संपादक श्री नारायण चोरमले यांना मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी नागरी सत्कार या निमित्ताने करण्यात आला यावेळी गावातील जेष्ठ नागरिक राजकीय सामाजिक पुढारी ग्रामपंचायत कमिटी सर्व लहान थोर ग्रामस्थ उपस्थित होते.