ब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरी शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारो हिंदू बांधवांची उपस्थिती 

राहुरी शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारो हिंदू बांधवांची उपस्थिती 

 

 

 

उंबरे येथील घटनेच्या निषेधार्थ व लव्ह जिहाद विरोधात देशभरात कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरीत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले होते. राहुरीतील वायएमसीए मैदानावर हिंदू समाज मोठ्या संख्येने घोषणा देत दाखल झाले. या जन आक्रोश मोर्चास स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

तालुक्यातील ग्रामिण भागातून हिंदू समाज भगव्या टोप्या व हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत घोळक्याने येऊन मोर्चात सहभागी झाले. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सुमारे ४५ हजार ते ५० हजार हिंदूंची संख्या असणारा शुक्लेश्‍वर चौकातून छत्रपती शिवाजी चौक ते शनिमंदिर चौक मार्गे जुन्या ग्रामिण रूग्णालयासमोर या मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपिठावरील आ. नितेश राणे, श्रीसंत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे महाराज, हर्षदा ठाकूर, एकलव्य संघटनेचे योगेश सुर्यवंशी, राष्ट्रीय श्रीराम संघ चे अध्यक्ष  सागर बेग यांनी आपल्या भाषणातून घटनेचा चांगला खरपूस समाचार घेतला.

नितेश राणे बोलताना म्हणाले, देशाच्या इतिहासात हिंदूंनी कधीच प्रथम दंगल घडविली नसून हिंदू समाज कधीच कुण्याच्या अंगावर जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सविधानाचे कायद्यांचे पालन करतो. हिंदूकडून अन्य धर्माच्या लोकांना कधीच त्रास होत नाही. प्रत्येकाने आपला धर्म संभाळावा व आम्हाला हिंदू म्हणून या देशात सुखाने जगू द्यावे.

यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राहुरी शहरातील काही धार्मिक स्थळांच्या आसपास पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच या मोर्चासाठी राहुरी पोलीसांबरोबर अनेक शिघ्र कृतीदलाचे विशेष पथके ही तैनात करण्यात आले होते. मोर्चा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेऊन होते. तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे सभास्थळी करडी नजर ठेऊन होते तसेच मोर्चामध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुरी शहर जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. या हिंदू जन आक्रोश मोर्च्यात खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, व अक्षय कर्डिले, राजूभाऊ शेटे, देवेंद्र लांबे, नंदकुमार तनपुरे, चाचा तनपुरे, नरेंद्र शिंदे, महेश उदावंत, संतोष आघाव,अशोक तनपुरे, रोहित नालकर, महेंद्र शेळके, राजेंद्र लबडे, संदिप गाडे, शरद तनपुरे, किशोर भोंगळ, हे सहभागी झाले होते.

या प्रसंगी भाजपचे नेते आ .नितेश राणे,बजरंग दल, स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी यांच्यासह सकल हिंदू समाज संघटनेचे कार्यकर्ते तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक आदिनाथ महाराज दुशिंग यांनी तर सुत्रसंचालन प्रसाद बानकर यांनी केले.

2/5 - (2 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे