शरीर आणि मन निरोगी ठेवणारा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सुजाता इंटरनॅशनल स्कुल ,सोनई मध्ये उत्साहात साजरा.*_
_*शरीर आणि मन निरोगी ठेवणारा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सुजाता इंटरनॅशनल स्कुल ,सोनई मध्ये उत्साहात साजरा.*_
_*सोनई (21 जून 2022) आज सुजाता इंटरनॅशनल स्कुल येथे सर्वांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला उपस्थित होते. नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य विभागात कार्यरत असणारे श्री. विजय बजांगे सर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.*_
_*सकाळी 9 वा शाळेच्या प्रांगणात शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले व श्री विजय बजांगे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यास शिकवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले . विजय बजांगे सर यांनी जमलेल्या सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले व सतत योग करण्यास प्रोत्साहन दिले*_
_*दरम्यान शाळेतील शिक्षकांनी योगाचे महत्त्व पटवून दिले तसेच संस्थापक श्री किरण सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या*_