ब्रेकिंगमहाराष्ट्र

माऊलींच्या समाधी मंदिरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी. भाविकांचे हाल मंदिर परिसरा कडे जाणारे रस्ते अचानक केले गेले बंद*

*माऊलींच्या समाधी मंदिरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी. भाविकांचे हाल मंदिर परिसरा कडे जाणारे रस्ते अचानक केले गेले बंद*

 

अधिक मास महापर्वणी काळानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मंदिरामध्ये चारी बाजूने गर्दी ओसंडून वाहत होती. श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती तील त्रुटी मात्र आज या निमित्ताने दिसून आल्या. दरवाजे बंद तर बऱ्याच ठिकाणी दर्शनाला असणाऱ्या भाविकांना दर्शनापासून वंचित करत बाहेर काढण्यात आल्याची घटना आळंदीमध्ये घडलेली आहे. गर्दी नियंत्रण करण्यात यासाठी पोलीस यंत्रणेने माऊलींच्या मंदिराच्या सर्व दरवाजांचा ताबा घेतला गर्दी काही हाटेना म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व उपायांचा उपयोग प्रशासनाकडून केला गेला.या गोष्टीला नेमका जबाबदार कोण हा प्रश्न तर नंतर मात्र मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करणे.तसेच वाहतुकीचे नियंत्रणाबाबत समजुती बाबतची कमतरता दिसून आली. दर्शनाला आलेल्या भाविकांचा हिरमोड झाला परंतु अतोनात दुःख मनात घेऊन भाविक मात्र परततानाही दिसले. याबाबत आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या क्षेत्रोपाध्ये असलेल्या संकेत वाघमारे यांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.एका ज्येष्ठ नागरिकाला भारत सरकारकडून अपंगत्वामुळे मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे म्हणजे युनिक डिसाबिलिटी कार्ड. जे भारत सरकारने अपंगत्वाने व्यथित होऊन कष्टमय जीवन जगणाऱ्यांसाठी काढण्यात आलेले आहे..आणि ज्या ओळखपत्रामुळे अशा व्यक्तींची प्रमाणात वारंवार सिद्ध करण्याची गरज नाही.अशा कार्डच्या आधार घेतलेल्या व्यक्तीलाही दर्शनासाठी हे कार्ड दाखवून ही न सोडता. इतरांना मात्र सोडले गेले.अशी तक्रार या जेष्ठ नागरिकांने केलेली आहे.या नागरिकाचे नाव गजानन बबन राऊत राहणार शिक्रापूर असे असून सदर व्यक्ती पंढरी ची वारी करण्याचा नित्य नियमाने करत आहे,भाविक आहे, त्या गजानन राऊत यांना. पंढरपूर येथे या कार्डच्या अंतर्गत दर्शनासाठी सुलभता प्राप्त करून देण्यात आली होती.मात्र आळंदीत आल्यानंतर ह्या अशा प्रकारे घडलेल्या घटनेने ते कमालीचे निराश होत व्यथित झाल्याचे दिसून आले. मुळात मंदिर व्यवस्थापनामध्ये असलेल्या त्रुटींचा फटका भाविकांना तर बसलाच परंतु स्थानिक ग्रामस्थांचं मंदिर समितीमध्ये अस्तित्व असणे किती गरजेचे आहे हे सुद्धा पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित होत आहे. नुकत्याच विश्वस्त पदाच्या जागा रिक्त झालेल्या आहेत. आळंदीतील स्थानिक ग्रामस्थ विश्वस्त असावा म्हणूनही मागणी होत आहे. परंतु तू का मी या भांडणाच्या वादात नागरिक, भाविक,मात्र दर्शनापासून वंचित होण्याची प्रथा परंपरा आताही कायमच राहिल्याची दिसून आलीय.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे