मानमोडीत शॉर्टसर्कीटमुळे घराला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक
मानमोडीत शॉर्टसर्कीटमुळे घराला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक
आगीत लाखोंचे नुकसान गावकऱ्यांकडून मदतीचा यज्ञ सुरु
शेतकऱ्याच्या लाकडी माळवदाच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह घरातील वेचणी केलेल्या कापुस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मानमोडी येथे घडली असून यामध्ये सदरील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. तर आर्थिक संकटात सापडलेल्या पौळ कुटुंबासाठी मानमोडीच्या ग्रामस्थांनी देखील मदतीचा यज्ञ सुरु केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील अर्जुन राघुजी पौळ या शेतकऱ्याच्या राहत्या लाकडी माळवदाच्या घराला मंगळवार दि.२९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आग लागून आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्यासह घरातील वेचणी केलेला कापुस, अन्नधान्य सह आदि जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये सदरील शेतकरी कुटुंबाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली जात आहे. तसेच गावकऱ्यांनी देखील पौळ यांच्यासाठी मदतीचा यज्ञ सुरु केला आहे.