शहराबरोबरच जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या शाखा सुरू करून हिंदू धर्म जागरणाबरोबरच बालसंस्कार केंद्रांना ताकद देण्याचा मानस राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाऊ बेग यांनी केला व्यक्त.
*श्रीरामपूर शहराबरोबरच जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या शाखा सुरू करून हिंदू धर्म जागरणाबरोबरच बालसंस्कार केंद्रांना ताकद देण्याचा मानस राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाऊ बेग यांनी व्यक्त केला आहे.*
शहरात काल एकाच दिवशी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे उदघाटन शेकडो हिंदू धर्म रक्षकांच्या आणि माता भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. सायंकाळी भगवे फेटे ,भगवे टिळे लावून शेकडो धर्म रक्षकांनी मोटार सायकल रॅलीने जाऊन श्रीरामपूर शहरातील जिनिंग प्रेस जवळील शेळके हॉस्पिटल समोर,नेवासा रोडवरील अंजली काट्या समोर आणि सरस्वती कॉलनीजवळील भगवा चौक याठिकाणी शाखांचे उदघाटन केले तर काळा मंदिर रोडवरील टिळेकर हॉस्पिटल समोरील राष्ट्रीय श्रीराम संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर भाऊ शेटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन सागर भैय्या बेग व आकाश भाऊ बेग यांच्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी शिर्डी शहर अध्यक्ष म्हणून जितेंद्र निकम यांची तर उपाध्यक्षपदी चेतन चव्हाण या धर्म रक्षकांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .
हिंदू धर्माला आलेली मरगळ दूर करण्यासाठी बालसंस्कार केंद्र ठिकठिकाणी सुरू करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आव्हान करत सागर बेग म्हणाले की,येणाऱ्या काळात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या शाखा सुरू करून लव जिहाद , लँड जिहाद सारख्या देश विघातक कारवायांना आळा घालण्यासाठी आता युवकांनी पुढे येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे असेही आवाहन याप्रसंगी सागर बेग यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शहरात तीन ठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या शाखा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महेश गायकवाड, गणेश राऊत,अजिंक्य काथे,राहुल वाघमारे,किरण शिंदे ,रवींद्र खाजेकर व किशोर रोकडे या धर्म रक्षकांचे उपस्थितांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या .