तालुक्याचे तहसील कार्यालय हे नागरिकांसाठी डोकेदुखी बनत चालले

श्रीगोंदा तालुक्याचे तहसील कार्यालय हे नागरिकांसाठी डोकेदुखी बनत चालले
आहे.कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर तहसीलदार यांचा वचक राहिलेला नाही.त्यातून अंधाधुंद कारभाराची प्रचिती नागरिकांना येत असू असून यातून मोठे जनांदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
तहसील कार्यालय आता नागरिकांना आपलेसे वाटतं नाही. तहसीलदार मिलिंद कुलथे हे इथे आले तेंव्हा खूप लोकप्रिय झाले, परंतु आता त्यांना इथली हवा लागली. सुरवातीला त्यांनी शानदार प्रयोग करत प्रशासन गतिमान केले. पण आता प्रशासन तितकेच कासव गतीने सुरु आहे. कोणत्या विभागातील कर्मचारी काय काम करतात याची कल्पना सुद्धा त्यांना नसते. पुरवठा विभागातील कारकून त्यांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. अन्नसुरक्षा योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. अन्नसुरक्षेचा लाभ मिळावा म्हणून नागरिक वर्षभर झाले हेलपाटे मारत आहेत तरी त्यांना अधिकारी प्रसन्न होत नाही परंतु चिरीमिरीचा प्रसाद दिला कि आपसूकच पुढ्यात अन्न सुरक्षित केले जाते. शिधापत्रिका साठी वशिला असेल आणि आर्थिक तडजोड झाले तरच काम होते. पुरवठा विभागात दलालांची साखळी काम करत आहे हे माहित असताना तहसीलदार गप्प बसून आहेत. असा सवाल तालुक्यातील नागरिक करत आहे
रेशनकार्ड साठी हजारो रुपये घेतले जात आहेत.पुरवठा विभागात ठराविक लोक रजिस्टर हाताळणी करत आहेत तर हात ओले झाल्याशिवाय ते लोकांशी बोलत सुद्धा नाहीत.प्रत्येक रेशनकार्ड साठी चलनाने पैसे स्वीकारून त्याचे रीतसर पोहोच अर्जदाराला देण्यात येत नाही,सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी पुरवठा लिपिकाला प्रश्न विचारण्याची हिमंत केली तर त्यांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करील असा दम दिला जातो. गाजावाजा करत सुरु करत केलेली रेशन कार्ड अदालत तहसीलदारांनी कधी बासनात गुंडाळली हे तर समजल पण नाही. दुकानदार यांच्यावरील तक्रारीनां तर केराची टोपली स्वतः तहसीलदार हेच दाखवत आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक सेल चे तालुकाध्यक्ष संदीप उमाप यांनी आंदोलनाचे पत्र देवूनही प्रशासन ढिम्म आहे.
आर. टी. एस संकलन चे लिपिक चांगले आहेत पण त्यांचे पंख अधिकाऱ्यांनी छाटले आहेत. तालुक्यातील एका सोसायटीच्या चेअरमन ने मध्यंतरी फेसबुक वर मोठी पोस्ट करत कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्या ठिकाणी निकाल तयार करण्यासाठी अण्णा ना ठेवल आहे. कोणाला निकाल काय द्यायचा हे आधी चहा च्या टपरी वर ठरल जाते त्यातच बबन नावाचा एक एजंट गोपनीय प्रकरण घरी घेऊन जात असून तिकडेच निकाल तयार करत आहेत.