आधी राष्ट्रध्वजाला वंदन,नंतर लग्न बंधन.

आधी राष्ट्रध्वजाला वंदन,नंतर लग्न बंधन.
घोडेगाव येथील नवं वधुवरांनी प्रथम प्राधान्य दिले राष्ट्र कर्तव्याला.
प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
घोडेगाव येथे दिनांक २६जानेवारी गुरुवारी ७४व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर घोडेगाव तालुका नेवासा येथे शिंदे व वैद्य या कुटुंबांचा विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यात २६जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वधु वरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी इच्छा व्यक्त करुन ती अमलात ही आणली.
याबाबत चे सविस्तर व्रुत्त असे घोडेगाव येथील पत्रकार दिलीप शिंदे यांची पुतणी व कैलास शिंदे यांची कन्या चि सौ का काजल .व अनिल भागवत वैद्य यांचे चि दत्तप्रसाद राहणार धोत्रे तालुका कोपरगाव यांचा शुभविवाह २६जाने रोजी दुपारी १२.४५वा होता. दोघेही वधुवर उच्च शिक्षीत वधु बी इ इलेक्ट्रिक तर वर बी ई मेकॅनिकल असल्याने लग्नाच्या बोहल्यावर चढण्या अगोदर २६जाने प्रजासत्ताक दिनानिमित्त जोडीने मंगल कार्यालय जवळच असणा-या मुळा पाटबंधारे कार्यालयात ध्वजवंदना साठी जाऊन मानवंदना दिली . हळदीच्या अंगाने मुंडावळ्या बांधुन ध्वजस्तंभाजवळ आलेली नवरा नवरी पासुन उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग अचंबीत झाला.
वधु वरांनी प्रथम राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पुजन केले. ध्वजवंदन , राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम पार पडला
यावेळी मुळा पाटबंधारे उप विभागीय कार्यालयाचे उप अभियंता एस बी पवार यांनी चि सौ का काजल व चि दत्तप्रसाद यांचे राष्ट्रीय प्रेम कर्तव्य भावनाचे कौतुक केले त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला त्यांच्या विवाह निमित्ताने शुभेच्छा ही दिल्या.
या आगळ्या वेगळ्या ध्वजारोहणास वधु काजल वर दत्तप्रसाद ,उप अभियंता एस बी पवार,एस आर शेरकर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, दादा औटी,जे इ कानडे,एस एस शेख,नाना वैरागर, चंद्रकांत शिंदे,दत्तात्रय शिंदे,कैलास शिंदे ,प्रशांत वाघ,प्रविण जाईबहार,ह भ प बापुसाहेब तुपे ,अनिल वैद्य सुनिल वैद्य,सुमित वैद्य सह व-हाडी मंडळी व मुळा पाटबंधारे चे अधिकारी, कर्मचारी ऊपस्थित होती.
आगळा वेगळा उपक्रम.
नेवासा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात प्रथमच चि सौ का काजल व चि दत्त प्रसाद या वधुवरांनी ध्वजवंदन कार्यक्रम करुन राष्ट्र कर्तव्याला प्राधान्य दिले अन् नंतर लग्न बोहल्यावर चढल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.