राकेश ओला श्रीरामपूर चे डी वाय एस पी होते तेव्हा त्यांनी या गावात अवैध धंदे बंद केले; परंतु आज मात्र जोमात चालू. काय होणार कारवाई ?
राकेश ओला श्रीरामपूर चे डी वाय एस पी होते तेव्हा त्यांनी या गावात व परिसरात अवैध धंदे बंद केले; परंतु आज मात्र जोमात चालू. काय होणार कारवाई ?
राहुरी तालुक्याच्या पूर्वेला असणाऱ्या मांजरी गावांमध्ये तसेच शेजारील गावांमध्ये अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलीस प्रशासन सुप्त असल्याचे दिसत आहे. मांजरी गावामध्ये अनेक वेळा दारूबंदीचा ठराव पास करण्यात आलेला असताना सुद्धा स्थानिक ठिकाणी गावठी दारू तसेच बनावट देशी विदेशी दारू ची जोमाने विक्री केली जात आहे.
आठ ते दहा वर्षांपूर्वी जेव्हा अधीक्षक राकेश ओला साहेब श्रीरामपूरचे डि वाय एस पी असताना मांजरी गावातील अवैध धंद्यावर करडी नजर ठेवून त्यांनी धंदे बंद केले होते परंतु आता अधीक्षक पदी रुजू झाल्यानंतर सुद्धा मांजरी गावात अवैध धंदे जोमाने सुरू आहेत.
मटका, जुगार अशा नानाविध अवैध धंद्यांची दिवसाची उलाढाल दहा ते पंधरा लाख होत असून स्थानिक पोलीस प्रशासन कानावर हात ठेवून आहे.
अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी देऊनही पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्याचे दिसत असल्याने अवैध धंद्यावाल्यांची काही आर्थिक हितसंबंध आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
दारू,जुगारीमुळे अनेक नव युवकांचे प्रपंच देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी तातडीने लक्ष घालून या परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.