कृषीवार्ता
टाकळीभान गावांच्या परिसरात लम्पी आजाराने ३३२ जनावरे बाधित होती. त्यांपैकी २२६ बरी झाली. ८८ औषधोपचार जनावरांवर सुरू आहेत, तर अठरा जनावरे दगावली आहेत.
येथी टाकळीभान गावांच्या परिसरात लम्पी आजाराने ३३२ जनावरे बाधित होती. त्यांपैकी २२६ बरी झाली. ८८ औषधोपचार जनावरांवर सुरू आहेत, तर अठरा जनावरे दगावली आहेत.
टाकळीभान पशुवैद्यकीय कार्यक्षेत्रातील दवाखान्याच्या घुमनदेव, कमालपूर, भामाठाण, महांकाळवाडगाव, खानापूर, मुठेवाडगाव, माळवाडगाव, भोकर या गावांतील ११ हजार ५०० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. राहिलेल्या जनावरांचे श्री लसीकरण सुरू आहे.
बाजारातून नवीन जनावरेखरेदी करू नयेत व गोठ्यातील जनावरांना आजाराची लम्पीसदृश लक्षणे दिसल्यास तत्काळ टाकळीभान पशुवैद्यकीय कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी दिलीप कोकणे यांनी केले आहे. लम्पी हा रोग माश्या, डास, चिलटे यांपासून पसरतो. जनावरांना ताप येणे, चारा न खाणे, पाणी न पिणे, रवंथ न करणे, अंगावर पाच ते पन्नास मिलिमीटरच्या गाठी, तसेच गायमध्ये याचे २५ ते ३० टक्के, तर म्हशींमध्ये एक ते दोन टक्के प्रमाण आढळून येत असल्याचे कोकणे यांनी सांगितले.ओउ