आई वडिलांच्या आशिर्वादामुळेच जीवनात यश प्राप्त होते –,सुरेश गलांडे

आई वडिलांच्या आशिर्वादामुळेच जीवनात यश प्राप्त होते –,सुरेश गलांडे
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत व आपल्या कर्तृत्वाच्या बळावर शेख यांनी पी एस आय पदी बढती मिळविने हे कौतुकास्पद असून आई-वडिलांचे नाव उंच केल्याचे बद्दल अभिमान असल्याचे गौरवोउद्गार अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे पाटील यांनी उंदींरगाव चे भूमिपुत्र पी एस आय रज्जाक भाई हुसेन शेख यांचां सत्कार करताना काढले.
उंदीरगाव ग्रामस्थांच्या वतीने शेख यांचा हनुमान मंदिर समोर वाजत गाजत सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश पाटील गलांडे बोलत होते.ते बोलताना पुढे म्हणाले की , घरची परिस्थिती गरिबीची असताना रोजगार हमीवर कामाला जाऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण त्यांनी ठेवली .त्यांच्या आशीर्वादामुळे व कष्टाने त्यांना यश प्राप्त झाले असल्याने आज ते उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पीएसआय शेख यांनी सत्कार बद्दल ग्रामस्थांच्या आभार मानले व गावकऱ्यांनी केलेला सत्कार हा आयुष्यातील सर्वात मोठा सत्कार असल्याचे सांगताना आपल्या यशामध्ये आई-वडिलांसह भावांचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपानराव नाईक सर यांनी केले.अध्यक्षस्थानी माजी सरपंच लक्ष्मण सरोदे हे होते. यावेळी सरपंच सुभाष बोधक, भागचंद कावडवाले कचरूभाऊ भालदंड ,रावसाहेब थोरात, मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच रमेश गायके, बाळासाहेब घोडे, माजी.जि. प. सदस्य बाळासाहेब नाईक, लक्ष्मण बाद्रे, बशीर भाई तांबोळी ,इसाक भाई तांबोळी, मंजाबापू नाईक, बाबासाहेब नाईक , विजय गिरहे, पाडुभाऊ राऊत पाराजी ताके , रामदास ताके , पंडित टेलर्स,सदाशिव आवहाड ,अशोकराव रोकडे सह ग्रामस्थ उपस्थित होते
सूर्योदय नागरी पतसंस्था व त्यांच्या वर्ग मित्रांनी त्यांचा सत्कार यावेळी केला त्या वेळी अनिल गायकवाड,दिलीप गायके,संजय सोनार, डॉ.संजय नवथर,रामभाऊ परदेशी,रामलाल भालदंड,मच्छिंद्र भालदंड आदी मिञ उपस्थित होते.