बेलापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोल्हार चौकामध्ये असलेले एटीएम सेंटर फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

बेलापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोल्हार चौकामध्ये असलेले एटीएम सेंटर फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला
बेलापूर पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकताच एटीएम सेंटर मधील तीन-चार व्यक्ती अंधाराचा फायदा घेत केले पलायन
आज दि. 06/06/2025 रोजी रात्री 02/18 वा.चे ते 02/48 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी त्यांचेकडील काळ्या रंगाचे कार मधुन येवुन बेलापुर बु. येथील कोल्हार चौकातील आमचे सारीका एंटरप्रायजेस डिस्टीब्युटर्स असलेले इंडीया वन प्रा, लि, चे ए.टी.एम. मशीनची ढकलुन कॅबीनच्या बाहेर काढुन कारमधे टाकण्याचा प्रयत्न करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. व ए.टी.एम मशीनचा डिस्प्ले व वरील काही भागाचा तोडुन नुकसान केले आहे तसेच कॅबीनचा दरवाजा तोडुन नुकसान केले आहे.
तीन ते चार अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे .घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसराज शिवपुजे ,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या आहेत.
अज्ञात व्यक्तीने बेलापूर चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता यांनी तत्काळ अधिकारी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे,पोलीस अंमलदार संपत बडे , नंदकिशोर लोखंडे सचिन कुमार बैसाणे, कुलदीप पर्वत ,धनंजय वाघमारे ,महेश थोरात आदी पथकातील कर्मचारी रात्री तात्काळ घटनास्थळी हजर होऊन एटीएम फोडण्यापासून वाचवले पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली बेलापूर दृक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी करत आहेत