महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांचे वतीने विवीध योजना बाबत माहिती साठी वारी शिक्षणाची*
*महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांचे वतीने विवीध योजना बाबत माहिती साठी वारी शिक्षणाची*
*
आळंदी( दि.२१) पंढरी आषाढी वारीच्या निमित्ताने आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थानाचे प्रसंगी, शिक्षण विभागाचे वतीने वारी सोबत शिक्षण विभागाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या मोबाईल व्हॅन चे उदघाटन अलंकापुरी (आळंदी ) येथे पुणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी श्रीम. संध्या गायकवाड मॅडम यांच्या हस्ते फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्री अशोक गोडसे सर,आदर्श शाळा धानोरे शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यवान लोखंडे सर, श्री तेजराज सारुक सर , श्री पांडुरंग आव्हाड सर, श्री प्रशांत आंधळे सर, श्री सुखदेव क्षीरसागर सर यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. शिक्षण विभागाच्या योजना सर्वसामान्य विध्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या चित्र रथाचा उपयोग होईल असे श्रीम संध्या गायकवाड यांनी या प्रसंगी सांगितले. वारी च्या मार्गांवरील व परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापक शिक्षकांनी या मोबाईल व्हॅन ला भेट देऊन शिक्षणविभागाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी श्रीम संध्या गायकवाड यांनी या प्रसंगी केले.