राहुरी तालुक्यातील सडे शिवाराती ४४ वर्षीय विवाहित पुरूषाचा रेल्वे लाईन भुयारी मार्गाच्या जवळ मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ
राहुरी तालुका/अशोक मंडलिक
राहुरी तालुक्यातील सडे शिवाराती ४४ वर्षीय विवाहित पुरूषाचा रेल्वे लाईन भुयारी मार्गाच्या जवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उंबरे येथील डाॅ. सतिष लक्ष्मण दुशींग असे या मृताचे नाव आहे.
उंबरे (ता.राहुरी) येथील डाॅ.दुशींग हे वैद्यकिय क्षेञात काम करत होते. रविवारी राञी आपला शेतात टॅक्टर चालकाचा डबा घेऊन ते गेला असता ते सकाळ पर्यंत घरी न आल्याने त्यांची शोधाशोध केली असता त्यांचा सोमवारी सकाळी सडे शिवारात रेल्वे लाईनच्या जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,आई,वडिल ,भाऊ,भावजय असा परिवार आहे. सदर मृतदेह हा रेल्वेलाईन च्या जवळील भुयारी मार्ग जवळ आढळून आल्याने हि घटना आत्महत्या की अपघात हे माञ समजू शकले नाही. घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाव घेत अधिक माहिती घेतली आहे.