एकात्मिक शेती पध्दतीच्या यशस्वीतेसाठी एकत्रीत प्रयत्नांची गरज* *एकात्मिक शेती पध्दती शेतकर्यांसाठी फायदेशीर * *- माजी कुलगुरु डॉ. शंकरराव मगर*

*एकात्मिक शेती पध्दतीच्या यशस्वीतेसाठी एकत्रीत प्रयत्नांची गरज*
*एकात्मिक शेती पध्दती शेतकर्यांसाठी फायदेशीर *
*- माजी कुलगुरु डॉ. शंकरराव मगर*
राहुरी तालुका/अशोक मंडलिक
दि. 24 जानेवारी, 2022
वातावरणातील हवामान बदलाचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातुन शेती व शेतकरी वाचवायचा असेल तर पुर्वीच्या शेतीपध्दतीमध्ये बदल करुन एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल आत्मसात करावे लागेल. या एकात्मिक शेती पध्दतीच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी मिळुन एकत्रीतपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शंकरराव मगर यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतिक बँक अर्थसाहित भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्प कार्यरत असून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व मोदिपूरम, उत्तरप्रदेशातील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत असणार्या शेती पध्दतीवरील भारतीय संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 ते 23 जानेवारी, 2022 या कालावधीत शाश्वत शेती करीता एकात्मिक शेती पध्दती या विषयावरील तीन आठवड्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ऑनलाईन आयोजीत करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. मगर बोलत होते. याप्रसंगी भारतीय शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए.एस. पनवार, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि प्रशिक्षणाचे कोर्स डायरेक्टर डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
डॉ. मगर पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील युवा शेतकरी, गावागावातील शेतकरी गट व कृषि उद्योजक यांच्या एकत्रीत प्रयत्नातून एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा विस्तार सर्वदूर करुन त्याद्वारे गा्रमीण अर्थकारण बळकट होवू शकते. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणुन उपस्थित असलेले डॉ. ए.एस. पनवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की एकात्मिक शेती पध्दती हे परिपूर्ण विज्ञान असून या एकात्मिक पीक पध्दतीमुळे शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पटच नाही तर तीन पटीने वाढू शकते. हे तंत्रज्ञान शेती शाश्वत होण्याच्या दृष्टीने योग्य मार्ग आहे. कार्बनमुक्त अर्थव्यवस्था ही फक्त एकात्मिक शेती पध्दतीद्वारेच शक्य होईल. शेती करणार्या जास्तीत जास्त शेतकर्यापर्यंत हे एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल पोहचले तरच शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. यावेळी डॉ. शरद गडाख आपल्या भाषणात म्हणाले की विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या शेती धोरणात एकात्मिक शेती पध्दतीतील घटकांचा समावेश असल्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण नगन्य आहे. राहुरी कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलमुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला निश्चितच चालना मिळाली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. कास्ट कासम प्रकल्पाद्वारे आतापर्यंत घेतलेल्या प्रशिक्षणांचा आढावा डॉ. मुकुंद शिंदे यांनी सादर केला. डॉ. उल्हास सुर्वे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा सादर केला. यावेळी वैभव शेलार, अरुण बालाजी, मंजू टंडण, डॉ. व्ही.एम. जाधव व डॉ. जयंती चिन्नूसामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणाच्या शेवटी घेण्यात आलेल्या समुह सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारीतोषीके देण्यात आली. या प्रशिक्षणाचे निमंत्रक म्हणुन डॉ. एन. रविशंकर व डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी तर सह निमंत्रक म्हणुन डॉ. मुकुंद शिंदे यांनी काम पाहिले. डॉ. उल्हास सुर्वे यांनी कोर्स डायरेक्टर म्हणुन तर डॉ. मिराज अन्सारी व डॉ. आर.एम. गेठे यांनी प्रशिक्षणाचे सह आयोजक म्हणुन काम पाहिले. या प्रशिक्षणासाठी देशभरातून 60 प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली होती. या तीन आठवड्याच्या प्रशिक्षणात 45 तज्ञांनी 60 सेशनद्वारे प्रशिक्षणार्थींना एकात्मिक शेती पध्दतीच्या विविध मुद्द्यांवर प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलम कोंडविलकर व डॉ. रोहित सोनवणे यांनी केले तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी डॉ. रघुविर सिंग व इंजि. मोहसीन तांबोळी यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणुन काम पाहिले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता तसेच विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ व कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते.
राहुरी तालुका
üअशोक मंडलिक