ब्रेकिंग
निधन वार्ता कै. दत्तात्रय उर्फ पप्पू विलास पवार
तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन….
भेर्डापूर मधील कै दत्तात्रय उर्फ पप्पू विलास पवार यांचे अतिशय तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.वय वर्ष २७ असून शेती काम करत असत.
सकाळच्या वेळेस सुमारे ९ :३० वाजेच्या दरम्यान चमक निघली म्हणून श्रीरामपूरला
संजीवनी हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना हृदय विकाराच्या अति तीव्र झटक्याने कै दत्तात्रय पवार यांचे सकाळी १०:३० च्या दरम्यान निधन झाले आहे.सदर व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील असून गावात अतिशय उत्तम व्यक्तिमत्त्व होते.असे त्यांच्या अचानक जाण्याने सर्व पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै.दत्तात्रय विलास पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आई-वडील, एक भाऊ, एक बहिण , 2 चुलते असा त्यांच्या मागे परिवार आहे.