ऊर्जामंत्र्यानी पिण्याच्या सर्व पाणी योजना त्वरित चालू करन्याचे आदेश द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल=सुरेशराव लांबे पाटील
ऊर्जामंत्र्यानी पिण्याच्या सर्व पाणी योजना त्वरित चालू करन्याचे आदेश द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल=सुरेशराव लांबे पाटील
राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमधील सोनई-करजगाव व 16 गावे , मिरी-तिसगाव व ईतर 44 गावे,बु-हानगर व ईतर 44 गावे,वांबोरीवांबोरी ग्रामपंचायत अशा चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना महावितरण अधिकाऱ्यांनी थकबाकीच्या नावाखाली 14 तारखे पासुन बंद केल्यामुळे राहुरी तालुक्यातील व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील 111 गावातील लाखो लोकांना धरणात पाणी असताना व मतदार संघातील आमदार ऊर्जा राज्यमंत्री असताना आज मतदार संघातील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरत आहे, विदुत महावितरण अधिका-यांनी विज बिल थकबाकीच्या नावाखाली कुठलीही पुर्व सुचना न देता या चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कोणाच्या आदेशाने बंद केल्यात, ऊर्जा राज्यमंत्री यांनी मतदार संघा बाहेरील लक्ष कमी करुण आपल्याला ज्या लोकांनी निवडुन दिले आधी त्यांचे प्रश्न सोडवावेत व महावितरण आधीकारी यांना त्वरीत आदेश देऊन
सर्व प्रादेशीक पाणी पुरवठा योजनांचा विदुत पुरवठा सुरळीत करुण सहकार्य करावे या सर्व पाणी योजना त्वरीत चालु कराव्यात अन्यथा आम्हाला सर्व नागरीकांना सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल असाक इशारा राहुरी प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला,
शासनाने सर्व पाणी पुरवठा योजनांचे विजबिल HP प्रमाणे द्यावेत किव्हा स्वता भरावेत व त्यासाठी स्वतंत्र निधी उपल्बध करुन द्यावा ज्या ज्या पाणी योजना बंद झाल्यात त्यांचे बंदचे कारण लाईट बिल अभावी बंद झाल्याचे समोर येते प्रत्ये गावातील पाणी पट्टी 100% वसुल होत नाही झाली तरी त्यापेक्षा विद्दुत महावितरणाचे मिटर प्रमाणे बिल जास्त असते,ग्रामपंचायत पाणी पट्टी वसुल करुन त्यातुन,बिज बिल हा एकच खर्च नाही,इरीकेशन पाणी पट्टी,मोटारदुरुस्ती व लिकेज मेन्टनेस,कामगार यांचे पगार,हा सर्व एकुण हिशोब आवक कमी व जावक जास्त असल्यामुळे अनेक योजना बंद होतात शासन या योजनेसाठी कोट्यावधीचा निधी खर्च करते ती योजना किरकोळ कारणाने बंद पडते त्यासाठी पानी हे जिवण आहे सर्व आजार हे पाणी बदल झाल्याने होतात नागरीकांना मुळा धरणाच्या पाण्याची सवय झाली आहे व योजना जास्त दिवस बंद राहील्यास त्याच्या आरोग्यास मोठा धोका होऊ शकतो त्यांना सर्दी खोकला निमुनीया या सारखे आजार होऊ शकतात, व अशा लोकांची कोरोणा टेस्ट केल्यास रिपोर्ट पाॅझीटीव येऊ शकतो व तो व्यक्ती धास्तीने गतप्राण होऊण त्याचे कुटुब उदवस्त होऊ शकते,मागेही याच कारणाने उंबरे ब्राम्हणी व अनेक गावातील बळी गेलेत आता पुन्हा ती वेळ देऊ नका शासनाने सर्व सामान्य नागरीक आजारी पडल्यावर खर्च करण्यापेक्षा आजारी पडु नाही त्यासाठी खर्च करावा
आजुनही कोरोणाच्या बातम्या व आफवा बातमीतुन येतात व सर्व सामान्य नागरीक धास्तवतात म्हणुन राज्य शासनाणे सर्व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे विजबिल स्वता भरुन पाणी पुरवठा करणा-या सर्व कर्मचा-यांचा शासनामंध्ये समावेश करुण त्यांना कायमस्वरुपी करुन घयावेत,ग्राम निधी व पाणी पट्टीतुन वसुलीतुन ग्रामपंचायतीला हे शक्य नाही तरी ह्या सर्व मागण्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या वतीने करीत आहे,स्थानीक मंत्र्यांनी लक्ष न दिल्यास लवकरच राज्यमंत्री ना बच्चुभाऊ कडु यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावु अशी मागणी पिप्री अवघडचे माजी सरपंच व प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी पत्रकात केली