स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्याचे अश्वासन

स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्याचे अश्वासन
नागपुर ,श्रीरामपुर (प्रतिनिधी )-स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात विचार विनिमय करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी तातडीने 4 जी मशिन देण्यात यावी एनआयसीच्या कामकाजात सुधारणा करण्यात यावी आदीसह विविध मागण्या संदर्भात आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन निवेदन दिले.
महाराष्ट्र एकुण ५५ हजार स्वस्त धान्य दुकाने असुन दुकानदारांना कमी प्रमाणात कमीशन मिळत असल्यामुळे दुकानदारांच्या कमीशनमध्ये वाढ करण्यात यावी अनेक वेळा नेट अभावी दुकाने बंद ठेवण्याची वेळ येते त्यामुळे कार्डधारकांची गैरसोय होते म्हणून दुकानदारांना 4 जी मशिन देण्यात यावे पाँज मशिनला सुविधा पुरविणाऱ्या एनआयसीच्या कामकाजात सुधारणा व्हावी कुठलेच धान्य वेळेवर मिळत नाही त्यामुळे त्या महिन्याचे धान्य त्याच महिन्याला मिळावे मोफत धान्य वाटपाचे कमीशन तातडीने वर्ग करण्यात यावे आवश्यक त्या ठिकाणी केरोसीन वितरण सुरु करण्यात यावे आयएसओ मानांकनाची सक्ती करण्यात येवु नये अशा मागण्याचे निवेदन आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या वतीने राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेे
. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर आमदार सरोज अहीरे आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे नागपुर विभागीय अध्यक्ष संजय पाटील नांदेंड जिल्हाध्यक्ष अशोकराव ऐडके नागपुर शहराध्यक्ष सुभाष मुसळे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख हिंगोली जिल्हाध्यक्ष भिकुबाई मोहीते नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे शाहु गायकवाड धर्मराज चौधरी अरुण बागडे इगतपुरी गोपी मोरे दिंडोरी सुदाम पवार देविदास पगारे दशरथ मेधने कैलास मोखनळ राहुल गायकवाड अमोल धात्रक केशव भुसारे नितीन शार्दुल प्रकाश पगार रवी माळगावे भास्कर पताडे आदि पदाधिकारी उपस्थित होते