श्री क्षेत्र तिळापूर येथे श्री संगमेश्वर गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेची संत महंतांच्या उपस्थितीत स्थापना
श्री क्षेत्र तिळापूर येथे श्री संगमेश्वर गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेची संत महंतांच्या उपस्थितीत स्थापना
श्री क्षेत्र तिळापूर येथील श्री संगमेश्वर देवस्थान प्रांगणात श्री संगमेश्वर गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना श्री क्षेत्र देवगडचे महंत धर्ममूर्ती गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
राष्ट्राच्या उन्नतीसाठी व जागृक युवक घडविण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थांची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.अचानक आलेल्या संकटाने उध्वस्त झालेल्या माणसांना उठून उभे करण्याचे काम समाजाने करावे असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री हे होते तर गुरुवर्य भास्करगिरी महाराज,नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे महंत हभप शिवाजी महाराज देशमुख,महंत शामसुंदरजी महाराज पुरी,महंत बाळकृष्ण महाराज,माजी आमदार पांडुरंग अभंग, श्री संगमेश्वर देवस्थान सर्व विश्वस्त मंडळ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी आलेल्या सर्व संत महंतांचे कार्यक्रम संयोजक
व संगमेश्वर गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप योगेश महाराज पवार यांनी स्वागत केले तर
गोंधवणी येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख हभप ऋषिकेश महाराज यांनी प्रास्ताविक करत प्रवरा व मुळा माईच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर या तीर्थक्षेत्रामुळे वारकरी शिक्षण संस्था ही अल्पावधीतच नावारूपाला येईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी योगीराज दादा महाराज वायसळ,हभप वक्ते महाराज,आळंदी येथील सीताराम बाबा मगर,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,भगवान महाराज जंगले शास्त्री, बाळकृष्ण महाराज दिघे,संतोष महाराज चौधरी,नारायण महाराज ससे, मच्छिंद्र महाराज चोरमले, ऋषिकेश महाराज वाकचौरे, रामनाथ महाराज पवार,सतीश मुळे सर, लक्ष्मण महाराज कदम, संजय महाराज सरोदे,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,गणेश महाराज दरंदले,रेवजी महाराज शिंदे,हरी महाराज जगताप, सखाराम महाराज जाधव,कृष्णा महाराज जिरेकर, कैलास महाराज फलके, संदीप महाराज जाधव,योगेश महाराज जाधव, भगवान महाराज डीके,सागर महाराज टेमक, किशोर महाराज गडाख,दत्तात्रय महाराज त-हाळ,हरी महाराज भोगे, देवगडचे सेवेकरी बाळकृष्ण महाराज कानडे,संगमेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संयोजक हभप योगेश महाराज पवार यांनी उपस्थित संत महंत भाविकांचे आभार मानले.