सधन व्यक्तींनी सवलतीच्या धान्याचा लाभ सोडून द्यावा अन्यथा कारवाई -जिल्हा पुरवठा अधिकारी माळी
सधन व्यक्तींनी सवलतीच्या धान्याचा लाभ सोडून द्यावा अन्यथा कारवाई -जिल्हा पुरवठा अधिकारी माळी
–सरकारी नोकरदार बागायती शेती असणारे ,खाजगी क्षेत्रातील मोठे पगारदार तसेच आर्थिक सक्षम असणाऱ्या सधन व्यक्तींनी अन्न सुरक्षा ‘योजनेतून बाहेर पडा’ योजनेचा लाभ घेवु अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणे बंद करावे अन्यथा सधन व्यक्ती अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी पुढे म्हटले आहे की शासनाने फेब्रुवारी 2014 पासुन अन्न सुरक्षा योजनेंतर्गत विहीत अटीनुसार पात्र असलेल्या अंत्योदय लाभार्थ्यांना 35 किलो व प्राधान्य कुटुंब असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याची योजना सुरु केली त्या वेळी अनेक सधन व्यक्तींनी या योजनेकरीता अर्ज करुन अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतलेला आहे .ईष्टांक पुर्ण झाल्यामुळे अनेक गरजु लाभार्थी आजही या योजनेपासुन वंचित राहीलेले आहेत गरजु लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याकरीता सधन व्यक्तिंनी अनुदानातून बाहेर पडा योजनेचा लाभ घेवुन अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडावे अनुदानातून बाहेर पडा या योजनेचा फाँर्म तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग संबधीत स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .समाजातील सधन व्यक्ती तसेच ज्यांना सवलतीच्या धान्याची गरज नाही अशा व्यक्तीनी अन्न सुरक्षा योजनेतुन बाहेर पडावे .जेणे करुन खऱ्या व गरजुंना सवलतीच्या धान्याचा लाभ देता येईल या अवाहना नंतरही सधन व्यक्तींनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास त्याचेकडून घेतलेल्या धान्याचे बाजारभावापेक्षा दुप्पट दराने वसुली केली जाईल .त्यामुळे कारवाई सुरु होण्या आगोदरच सधन व्यक्तींनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणे बंद करावे असे अवाहनही माळी यांनी केले असुन जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात या बाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत,