वांगी बुद्रुक वाळू डेपोसाठी उचलली जाणारी वाळू नेमकी गेली कोठे?
वांगी बुद्रुक वाळू डेपोसाठी उचलली जाणारी वाळू नेमकी गेली कोठे?
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे शासकीय वाळू डेपो चालू असून यासाठी दोन ठिकाणाहून वाळू उपसा चालू होता त्यातच गट नंबर 101 मधील ठिकाणाहून वाळू उपसा हा अवैध्यरित्या होत असल्याने मत खिर्डी ग्रामस्थांनी गावामध्ये चर्चेदरम्यान एकत्र येऊन निर्णय घेत वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी वांगी खिर्डी शिव रस्त्यावर ग्रामस्थांनी ठिय्या मांडत वाळू घेऊन जाणारे साधनांना घेराव घालत उभे करून महसूल विभागाला याबाबत माहिती देण्यात आल्याने तहसीलदार यांनी तलाठी व मंडल अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले.
तोपर्यंत ग्रामस्थांचा रोष वाढतच गेला असल्याचे दिसून येत होते. त्यावेळी तलाठी व मंडल अधिकारी यांनी येऊन वरिष्ठांच्या आदेशाने समक्ष वस्तुस्थिती पंचनामा करण्याचे ठरवले त्यावेळी रोडवरती उभे असलेले ट्रॅक्टर डंपर व जेसीबी यांचा पंचनामा करून प्रवरा नदीपत्रात वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा करत अवैधरित्या खिर्डी शिवारातून व राहुरी तालुक्यातील तिळापुर शिवारातून वाळू उपसा झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले.श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी शिवारातून वाळू उपसा झाल्याचे तेथे ग्रामस्थांसमोर पंचनामा करण्यात आला यावेळी प्रवारा नदीतून 600 फूट लांब व 18 ते 22 फूट खोल खिर्डी शिवारातून वाळू उपसा झाल्याबाबत पंचनामा करण्यात आला.
याच वेळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे प्रभारी आयपीएस अधिकारी बेनिवाल यांनी समक्ष ठिकाणी पाहणी करून ट्रॅक्टर डंपर व जेसीबी यांना ताब्यात घेण्याच्या सूचना देऊन ताब्यात घेण्यात आले.
तसेच समक्ष तहसीलदार यांनी येऊन पाहणी करत गट नंबर 101 मधून मंजूर असलेले वाळू उपसा ठिकाण बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु यामधील अवैधरित्या वाळू उपसा झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत असून नेमकी ही वाळू डेपोसाठीच गेली की काय डेपोसाठी गेली असेल तर प्रमाणापेक्षा उपसा झालेला आहे.
ज्या ठिकाणी गट मंजूर नसतानाही वाळू उचलण्यात आली आहे त्याबद्दल काय कारवाई होणार असा सवाल प्रशासनास ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. जर डेपो मध्ये वाळू गेली नसेल तर ती वाळू नेमकी गेली कोठे याबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. वरिष्ठ पातळीवरून या वाळू डेपोसाठी काय सूचना देण्यात आल्या होत्या व अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या त्या अटी शर्तीचा पूर्णपणे पायमल्ली झाल्याचे दिसून येत असून त्याचा वापर करून यावर काय कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागली आहे. पाणी असताना यांत्रिकीकरण बोटीच्या सहाय्याने हा वाळू उपसा झाल्यानंतर या अगोदरही याच गट मध्ये वाळू अवैधरित्या उचलत असले बाबत चार ते पाच पंचनामे झाले असून कुठलीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याच्या व वरिष्ठांना सर्व माहिती देऊन या डेपो संदर्भात काय कारवाई करता येईल याच्या हालचाली चालू आहेत असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे यावेळी खिर्डी व तिळापुर मधील ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटील तसेच सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आम्ही समक्ष येऊन पंचनामा केलेला आहे व पाहणी ही केलेली आहे मोजमाप करून एक्झिट ब्रास काढण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल.
श्रीरामपूर तहसीलदार वाघ.
राहुरी तालुक्यातील तिळापुर हद्दीत वाळू उपसा झाल्याचे दिसून आल्याने मी व तलाठी यांनी समक्ष ग्रामस्थांसमोर पंचनामा केलेला असून तिळापुर हद्दीमध्ये 13747 ब्रास वाळू उपसा झालेला असून त्याचे आम्ही मोजमाप केलेली आहे लवकरच अहवाल तयार करून वरिष्ठांकडे कारवाईसाठी पाठवणार आहे.
टाकळीमिया मंडल अधिकारी आघाव.
डेपोच्या नावाखाली डेपोसाठी गट मंजूर असलेल्या लगत खिर्डी व तिळापुर शिवारात वाळू उपसा अवैधरित्या करण्यात आलेला आहे तोही डेपोसाठी वाळू काढण्यात आलेल्या रस्त्यानेच वाळू गेलेली असल्याने लाखो प्रास वाळू चोरी केली त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषणाचा मार्ग निवडण्यात येईल
खिर्डी ग्रामस्थ