धार्मिक

तिळापुर दक्षिण मुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा व कळसरोहन निमित्त भव्य श्रीराम कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

तिळापुर दक्षिण मुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा व कळसरोहन निमित्त भव्य श्रीराम कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

 

राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील जुने गावठाण मधील गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांच्या प्रेरणेने दक्षिणमुखी हनुमान मंदिर चे काम गेले दोन वर्षापासून चालू होते ते अंतिम टप्प्यात आले अंदाजे 40 लाख रुपयांपर्यंत खर्च आलेला असून उर्वरित कामासाठी राहिलेल्या भाविक भक्तांनी आपापली देणगी जमा करावी तरी ज्या भाविक भक्तांना कलशासाठी देणगी द्यावयाची आहे त्यांनी देखील त्वरित जमा करावी.

त्यामुळे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसा रोहन शांती ब्रह्म हरिभक्त परायण गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री श्री क्षेत्र तारकेश्वर गड यांच्या हस्ते कार्यक्रम लवकरच  होणार असून या कार्यक्रमानिमित्त दक्षिण मुखी हनुमान मंदिर तिळापूर जुने गावठाण येथे दक्षिण मुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठे वेळी 17 /4/ 2024 बुधवार ते 22/04/2024 सोमवार पर्यंत दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत श्रीराम कथेचे नियोजन केलेले असून श्रीराम कथा तुलसी रामायण कथाकार ह.भ.प.गजानन महाराज वरकड श्रीक्षेत्र आळंदी देवाची यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार असून त्यांना तबलासात ह.भ.प.मारुती महाराज झाडे गायनाचार्य ह.भ.प.मुजाजी महाराज नांदगावकर सितसात ह.भ.प.शेळके महाराज आळंदी, कार्यक्रमाची रूपरेषा गुरुवार दिनांक 18/4/2024 रोजी कलश व मूर्तीची मिरवणूक होऊन शुक्रवार दिनांक 19/4/2024 रोजी गणपती पुण्यहवाचन ,प्रायचित्त,संकल्प जलाधिवास शनिवार दिनांक 21/4/2024 रोजी गृह स्थापना, होम हवन धान्यधीवास व रविवार दिनांक 21/4/2024 रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूर्णहुती व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल या सर्व कार्यक्रमासाठी ब्रह्मरुंद श्रीक्षेत्र पैठण येथील असून दिनांक 22/4/2024 सोमवारी कथेची सांगता होऊन मंगळवार दिनांक 23 4 2024 रोजी हनुमान जयंतीला सकाळी 9 ते 11 ह.भ.प.शब्दप्रभू अंकुश महाराज जगताप श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र नेवासा यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल.

 

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य समस्त भजनी मंडळ तिळापुर व पंचक्रोशी हनुमान भक्त परिवार किसनगिरी स्वच्छता भक्त परिवार संगमेश्वर भक्त मंडळ भगवान बाबा भक्त मंडळ जोगेश्वरी भक्त मंडळ श्रीराम भक्त मंडळ तिळापुर तसेच मंडप साउंड सिस्टिम सौजन्य नानासाहेब कोळेकर लाईट डेकोरेशन हरिभाऊ जाधव यांची आहे.
तरी समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे