गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

घूमनदेव सरपंचासह दोघे अपात्र, सरकारी जागेतील अतिक्रमण भोवले

घुमनदेव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांचे अपिल फेटाळले

 

सरपंचासह दोघे अपात्र, सरकारी जागेतील अतिक्रमण भोवले

 

टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्याच्या घुमनदेव ग्रामपंचायतीच्या सरपंच व दोन सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या तीन सदस्यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी अप्पर आयुक्त, नासिक यांच्या कोर्टात अपिल दाखल केले होते. मात्र अप्पर आयुक्तांनी हे अपिल फेटाळल्याने तिनही सदस्य अपात्र झाले आहेत. या निकालामुळे सरकारी जागेत अतिक्रमण करणाऱ्या सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.

जानेवारी २०२१ घुमनदेव ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांची चुरशीची निवडणूक झाली लगेच होती. निवडणुकीनंतर विरोधकांनी निबडून आलेल्या तीन सदस्यांविरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ पोटकलम (ज) (३) अन्वये जिल्हाधिकारी यांचेकडे सरकारी मिळकतीवर अतिक्रमण करुनही निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करताना खोटे शपथपत्र दाखल करून सामुहिक फसवणूक केली आहे.

सरकारी अगर ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करून राहत असल्यास त्या सदस्याची निवड कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र ठरत असल्याने केले होते. त्या तीन सदस्यांच्या निवडी रद्द ठरविण्यात याव्यात व या सदस्यांना सदस्यपदी राहण्यास ठरविण्यात यावे, असा विवाद अर्ज तीन वेगवेगळ्या अर्जदारांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कोर्टात दाखल केला होता. रणजित प्रताप बोडखे यांनी सरपंच उज्वला बाळकृष्ण कांगुणे यांच्या विरोधात राजाराम लहु रजपुत यांनी भारती मंगेश गायकवाड यांच्या विरोधात तर बापू नवले यांनी बाळासाहेब मारुती कांगणे यांच्या विरोधात विवाद अर्ज दाखल केले होते,

या अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदारांच्यावतीने दाखल कागदपत्र, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे अहवाल तपासून जिल्हाधिकारी यानी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करून उज्वला बाळकृष्ण कांगुणे यांना सरपंच तसेच सदस्य पदावर तसेच बाळासाहेब मारुती कांगणे व भारती मंगेश गायकवाड यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र त्यांचे ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द ठरवत असल्याचे आदेशात नमुद

वरील तीनही सदस्यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांच्या कोर्टात क अपात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला आव्हान देत अपिल केले होते. अप्पर आयुक्तांनी फोड जिल्हाधिकारी यांनी दाखल  दिलेला आदेश कायम ठेवत अपिलार्थीचे अखेर अपिल फेटाळले. त्यामुळे सरपंच पदावर असलेल्या उज्वला बाळकृष्ण कांगुणे, सदस्य भारती डॉ. मंगेश गायकवाड व बाळासाहेब मारुती कांगणे हे तीनही सदस्य ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरले आहेत.

 

त्याच धर्तीवर टाकळीभान त्या दहा सदस्याच्या निकालाकड संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी  सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचा विवाद अर्ज जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या कोर्टात प्रलंबीत असल्याने टाकळीभान ग्रामपंचायत सदस्यांचेही या निकालाने धाबे दणाणले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

 

 

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे