ब्रेकिंगमहाराष्ट्र
प्रभाग दोन मध्ये ड्रेनेज नाल्याचे कामास सुरुवात
प्रभाग दोन मध्ये ड्रेनेज नाल्याचे कामास सुरुवात
सोनई–जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व बांधकाम विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या सूचनेनुसार बेल्हेकर वाडी रोडवरील खनिजवळील प्रभाग 2 मध्ये सांडपाणी नाल्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते व शरद पवार विचारमंचचे महिला जिल्हा उपाध्यक्ष इंदूबाई वाघ / दरंदले यांनी मांडण्यात आलेल्या प्रश्नाची तातडीने सरपंच धनंजय वाघ व या भागातील सदस्य सचिन पवार, ग्रामसेवक वाडेकर यांनी समक्ष पाहणी करून तेथील नागरिकांसाठी चर- नाली उकरण्याचे काम हाती घेतले.
या भागातील विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सभापती गडाख यांनी दिले.या कामामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.