टाकळीभान येथे बाजार समितीचे उपबाजार आवारात , अनेक दिवसापासून दुर्गंधी व घाणी चे साम्राज्य

टाकळीभान येथे बाजार समितीचे उपबाजार आवारात , अनेक दिवसापासून दुर्गंधी व घाणी चे साम्राज्य
टाकळीभान प्रतिनिधी टाकळीभान येथे बाजार समितीचे उपबाजार आवारात , अनेक दिवसापासून दुर्गंधी व घाणी चे साम्राज्य पसरले होते पाहाणी करून ,स्वच्छ करण्याच्या सूचना नूतन संचालक विलास दाभाडे व मयूर पटारे यांनी दिले ,
लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकुटे साहेब आणि युवानेते करणदादा ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभापती श्री. सुधीरअप्पा नवले यांच्या नेतृत्वाखाली आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात स्वच्छते बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य असल्याच्या व त्यातून परिसरात दुर्गंध पसरत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांकडून येत होत्या. त्याची दखल घेऊन आज नूतन संचालक विलास दाभाडे मयूर पटारेआवारात पाहणी करण्यात आली.
पावसाळ्याचे दिवस जवळ येत असून त्यातून परिसरात दुर्गंधी पसरू नये या अनुषंगाने ज्या व्यापाऱ्यांना शक्य असेल त्यांना त्यांच्या गाळ्या समोर असलेला कचरा उचलून घेण्याच्या सूचना यावेळी दिल्या त्यास व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाही करत सहकार्य केले आहे
टाकळीभान उपबाजार आवारासाठीची साफ सफाई टेंडर प्रक्रिया सुरू आहे. परंतु तोपर्यंत तात्पुरते प्रयोजन म्हणून तातडीने जेसीबीच्या सहाय्याने कचरा उचलून घेण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत. लवकरच काम सुरू करून उपबाजार आवार स्वच्छ करण्यात येईल.