*धोंडराई बीट चोरट्यांच्या रडारवर*
*धोंडराई बीट चोरट्यांच्या रडारवर*
*गोपाळवस्ती , खामगाव येथील दरोड्यानंतर धोंडराईत सौर ऊर्जा मोटारींची चोरी*
गेवराई तालुक्यातील गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील धोंडराई बीट चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.धोंडराई बीट अंतर्गत येणाऱ्या गोपाळवस्ती , खामगाव या गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत ऐवज लुटत घरातील सदस्यांना मारहाण केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.
या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी आता सौर ऊर्जा योजनेच्या मोटारींच्या चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे.धोंडराई परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीवर लावलेल्या सौर ऊर्जा च्या मोटारींसह वायरची चोरी झाली आहे.शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी होण्याच्या घटना अनेकदा घडतात त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.यातच सतत दिवसाचा विद्युत पुरवठा होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणी कुसुम योजनेअंतर्गत आपल्या शेतात सोलार बसविले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पिकांना पाणी देणे शक्य झाले मात्र चोरटे त्यावर डल्ला मारताना दिसत आहेत.दिनांक २२ रोजी रात्री धोंडराई परिसरातील शेतकऱ्यांच्या सोलार योजनेतील विहीरीतील सहा पाणबुड्या विद्युत मोटारींची चोरी झाली आहे.यामध्ये शेतकऱ्यांच्या अंदाजे १११५६० रुपये किंमतीच्या सहा मोटारी चोरी गेल्या आहेत.याप्रकरणी सुरेश रामकिसन मेघारे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार दत्तु उबाळे हे करत आहेत.दरोडे, घरफोडी किंवा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींची चोरी थांबविण्याकरीता गेवराई पोलीसांनी तपास करुन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.चोरांचा तपास न लागता चोरटे मोकाट राहात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.