अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा…. कान्हा खंडागळे

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा…. कान्हा खंडागळे
टाकळीभान येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिके सडली आहेत, शेतातील कपाशी बाजरी, कांदा, सोयाबीन, मका आदी पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडली असून पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, महागडी औषधे शेतकऱ्यांनी पिकांवर वापरूनही रोगांचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, शेतातील पिके सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे, तरी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून कोणी नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन टाकळीभानचे कामगार तलाठी अरुण हिवाळे व कृषी सहाय्यक प्रियंका शिंदे यांना कान्हा खंडागळे यांच्या वतीने, व शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच कान्हा खंडागळे, प्रा. जयकर मगर, नारायण काळे, आबासाहेब रणनवरे,बापू शिंदे आदिसह शेतकरी बांधव उपस्थित होते.