नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

शेलार यांना जिवनदान देणाऱ्या पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांचा बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

शेलार यांना जिवनदान देणाऱ्या पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांचा बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

 

 

बेलापुर (प्रतिनिधी )-गावात कुठलीही घटना घडली तर सर्वात आगोदर धावत येतात ते पोलीस दादा सर्वांच्या मदतीला कायम धावणाऱ्या पोलीस दादाने केलेल्या अचुक उपचारामुळे व आमदार लहु कानडे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नुकताच एका नागरीकाला जीवदान मिळाले असुन आता तो रुग्ण दवाखान्यात व्यवस्थित उपचार घेत आहे . या बाबत घडलेली घटना अशी की बेलापुर येथील साई मंदिरांत आमदार लहु कानडे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाबाबत बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीस अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मंदिरात आमदार लहु कानडे हे भाषण करत होते व त्या ठिकाणी तान्हाजी बापुराव शेलार वय ७८ वर्ष हे साई मंदिरांच्या पायरीवर बसले होते त्यांना अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आला सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले होते तेथुन काही अंतरावर द्वारकामाई जवळ बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे उभे होते गर्दी कशाची जमा झाली म्हणून पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे त्या ठिकाणी गेले त्या वेळी हरिष पानसंबळ दादा तातडीने पुढे सरसावले त्यानी त्यांचा श्वास पाहीला मानेजवळ बघीतले सर्व शरीर गार पडले होते त्यांनी तातडीने तान्हाजी शेलार यांची छाती दाबली ठरावीक पद्धतीने छाती पंपीग करताच त्यांनी जोराचा श्वास घेतला आमदार लहु कानडे हे देखील मदतीसाठी धावले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले रमेश आमोलीक प्रसाद खराद सुरेश अमोलीक गौरव सिकची सुहास शेलार यांनी तान्हाजी शेलार यांना पुढील उपचारासाठी श्रीरामपुर येथे पाठविण्याची व्यवस्था केली श्रीरामपुर येथील संतलुक हाँस्पीटल येथे त्याचेवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले असुन त्यांची प्रकृती सुधारत आहे . पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे शेलार यांना जीवनदान मिळाले आहे .या बाबत शेलार परिवाराने बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना धन्यवाद दिले आहे.

 

बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ यांनी केलेल्या केलेल्या कार्याबद्दल शेलार परिवार व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ तसेच पोलीस काँन्स्टेबल नंदु लोखंडे तसेच शेलार यांना वाचविण्यासाठी धडपड करणारे बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले रमेश अमोलीक प्रसाद खराद सुहास शेलार गौरव सिकची सुरेश अमोलीक यांचाही सत्कार कारण्यात आला या वेळी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख महेश ओहोळ असलम बिनसाद किशोर कदम पोलीस पाटील अशोक प्रधान प्रकाश कुर्हे बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे संपत बढे उपस्थीत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर महेश ओहोळ यांनी आभार व्यक्त केले.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे