पंकजाताई उघडा डोळे बघा नीट, १३ कोटी रस्त्याची लोकार्पणानंतर ६ महिन्यातच झाली माती ;मुख्यमंत्री,प्रधान सचिव,ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
*पंकजाताई उघडा डोळे बघा नीट, १३ कोटी रस्त्याची लोकार्पणानंतर ६ महिन्यातच झाली माती ;मुख्यमंत्री,प्रधान सचिव,ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*
माजी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांनी बीड जिल्ह्य़ातील जलजीवन मिशन अंतर्गत टेंडर वाटप तसेच अनियमितता प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन परंतु पंकजाताई मुंढे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड असताना त्यांनी २०१५ ते २०२१-२२ या कालावधीत १९३३ किलोमीटर लांबीचे रस्ते व एकुण अंदाजित ११८६ कोटी रूपयांच्या प्रशासकीय मान्यता मिळवल्याचे जाहीर कार्यक्रमातुन सांगितले जाते मात्र त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व नातेवाईक यांनी अत्यंत निकृष्ट कामे करून पंकजाताई यांची दिशाभूल व शासनाची आर्थिक फसवणूक रस्ते ग्रामिण विकास संस्थेचे प्रशासकीय आधिकारी यांच्याशी संगनमतानेच केली असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन कंत्राटदार दंडात्मक कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी पंकजाताई मुंढे,खा.प्रितमताई मुंढे,जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
पंकजाताईनी लोकार्पण केल्यानंतर ६ महिन्यातच १३ कोटी रूपये रस्त्याची माती
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत बीड भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे मोठे बंधू एम.टी.कन्स्ट्रक्शन बीड यांच्या मार्फत बीड-पालवण ते लिंबागणेश एकुण लांबी २४ किलोमीटर व अंदाजित किंमत १२ कोटी ७५ लाख रूपयाचे काम करण्यात आले असून रस्त्याचे लोकार्पण लोकनेत्या पंकजाताई मुंढे यांच्याच हस्ते दि.१९ मार्च २०२२ रोजी करण्यात आले असून ६ महिन्यातच रस्ता पुर्णपणे उखडला असुन संबधित निकृष्ट रस्त्याप्रकरणात प्रशासकीय आधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात कारवाईची हिंम्मत दाखवावी:-डाॅ.गणेश ढवळे
जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात अभिनंदन परंतु मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात पंकजाताई मुंढे यांनी हिंमत दाखवुन कारवाई करावी अशी अपेक्षा डाॅ.गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.
वनविभागाच्या नियमांना हरताळ फासुन खडीक्रशर
बीड-पालवन-लिंबागणेश रस्त्यासाठी वापरण्यात आलेले मुरूम आदि खौणखनिज तसेच खडीक्रशर वनविभागा लगत असून वनविभागाच्या ५०० मीटर अंतरात खडीक्रशर मशीन टाकण्यास परवानगी नसताना खडीक्रशर मशीन असुन संबधित प्रकरणात तहसिलदार तसेच जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२