पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त नववी कक्षा व दहावी कक्षातील विद्यार्थी विद्यार्थिनींना ,मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर ,

पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त नववी कक्षा व दहावी कक्षातील विद्यार्थी विद्यार्थिनींना ,मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर ,
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान मध्ये देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त नववी कक्षा व दहावी कक्षातील विद्यार्थी विद्यार्थिनींना ,मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर ,टाकळीभान भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने करण्यात आले होते ,यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर राधाताई गमे यांनी विद्यार्थ्यांना तरुणपणातील समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला सरचिटणीस सौ सुप्रियाताई धुमाळ या होत्या प्रमुख उपस्थिती श्रीरामपूर येथील बीके शिंदे प्राचार्य इंगळे बी टी हे होते,
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नारायण काळे, भाऊसाहेब पवार ,मुकुंद हापसे ,श्रीकृष्ण वेताळ ,सागर रणनवर व शिक्षक पाचपिंड एम ए, मॅडम सोनवणे व्ही एच, नगरे एस व्ही , चाबुकस्वार पी यू,आदि उपस्थित होते,