टाकळीभान तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तीस ठेवू नये,संविधान ग्रुपच्या वतीने कामगार तलाठी यांच्याकडे मागणी.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील मौजे टाकळीभान तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तीस ठेवू नये अशी मागणी संविधान ग्रुपच्या वतीने टाकळीभान कामगार तलाठी यांच्याकडे यांच्याकडे निॅवेदनाद्वारे केली आहे
संविधान ग्रुप यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे म्हंटले आहे की,श्रीरामपूर तालुक्यातील कोणत्याही तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तीस काम करण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्टृ शासनाने शासन निर्णयानुसार आदेशित करण्यात येत आहे तरी या निवेदनाद्वारे आपणास निर्णयाचा आदर करुन आपल्या तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तीस ठेवण्यात येवू नये अन्यथा आम्ही सर्व संविधान ग्रुपच्या वतीने संविधानिक मार्गाने उपोषण सारख्या मार्गाचा अवलंब केल्या शिवाय रहाणार नाही तरी आमच्या निवेदनाची योग्य दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया संविधान ग्रुपच्या वतीने कामगार तलाठी यांच्याकडे करण्यात येत आहे.
निवेदनावर आप्पासाहेब नानासाहेब रणनवरे,जाॅन प्रकाश रणनवरे,प्रणव अमोलिक,सुंदर योव्हान रणनवरे,विजय सुखदेव आहेर,शरद कमलाकर रणनवरे,शामराव गजभीव,राजेंद्र रंगनाथ रणनवरे आदींच्या सह्या आहेत