अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वर नेवासा पोलिसांची कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वर नेवासा पोलिसांची कारवाई
नेवासा पोलीस ठाणे यांना त्यांचे गुप्तबातमी दारामार्फत माहिती मिळाली की, ज्ञानेश्वर मंदिराच्या मागुन एक टेम्पो बालू भरुण वाहतुक करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच परि.पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी पोलीस स्टाफ व पंचासमक्ष पोलीस ठाणे येथून तुकाराम महाराज चौकाकडे २२/५० वा चे सुमा जात असताना उस्थळ दुमाला रोडवर एक संशयीत टेम्पो दिसला त्याचा पाठलाग करुन त्यास थांबविले असता आम्हा पोलीस स्टाफ व पंचाची चाहुल लागताच सदर टेम्पो मधील चालका व्यतिरिक्त इतर ३ इसम हे पळून गेले. सदर वेळी टेम्पो मधील ताब्यात घेण्यात आलेला इसम यास आम्हा पोलीस व पंच अशी ओळख करुन त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश कान्हु धोत्रे वय २८ वर्षे रा. गंगानगर, नेवासा खुर्द ता नेवासा असे सांगितले सदर टेम्पोचा नं एम एच १२ जे एफ ६२८८ असा असलेला दिसला पोलीसस्टाफ व पंचानी टेम्पोच्या पाठीमागील हौदामध्ये डोकावून पाहिले असता त्यामध्ये अंदाजे ०१ ब्रास वाळु दिसुन आली सदर वाळु परवाना बाबत सदर इसमाकडे विचारपुस केली असता त्यांचेकडे कोणताही परवाना मिळुन आला नाही. गाडी मालका बाबत विचारणा केली असता त्याने गाडी मालकांचे नाव संतोष राजगिरे रा कसाईगल्ली नेवासा खुर्द ता नेवासा व इतर दोन इसमांची नावे माहित नसल्याचे सांगितले. परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे यांनी पंचासमक्ष एकुण ४,१०,०००/- रुपये किंमतीची अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो व त्यामध्ये अंदाजे ०१ ब्रास वाळु जप्त करण्यात आली असून आरोपी नामे १) आकाश कान्डू धोत्रे वय २८ वर्षे रा गंगानगर, नेवासा खुर्द ता नेवासा २) संतोष राजगिरे रा नेवासा ३) इतर दोन इसम यांनी संगणमत करुन टेम्पो क्र एम एच १२ जे एफ ६२८८ ही मध्ये चोरुन बाळु वाहतुक करित असले बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३२,३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हांचा पुढील तपास पोहेकों सुधाकर दराडे हे करित आहेत.
यापुढे ही बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारे वाहन / इसम व अवैध व्यवसाय करणारे तसेच पोलीस कारवाई मध्ये अडथळा आणणारे इसमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असुन अवैध धंदयाबाबत माहिती देणा-यांचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबमें उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनिल पाटीलयांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी अधिकारी संतोष खाडे, परि पोलीस उपअधीक्षक, पोकों श्रीनाथ गवळी, पोकों अवि वैदय, पोकों दहिफळे, चापोना संदिप बर्ड यांनी केलेली आहे.