ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

घरकुल यादीत राजकिय द्वेशाने प्रेरीत होवुन पाञ लाभार्थ्यांना डावलुन मर्जीतील सधन कुटुंबाची नावं सामाविष्ट

घरकुल यादीत राजकिय द्वेशाने प्रेरीत होवुन पाञ लाभार्थ्यांना डावलुन मर्जीतील सधन कुटुंबाची नावं सामाविष्ट – nanasaheb pawar

 

टाकळीभान तेथे घरकुल यादीत राजकिय द्वेशाने प्रेरीत होवुन पाञ लाभार्थ्यांना डावलुन मर्जीतील सधन कुटुंबाची नावं सामाविष्ट करुन गोरगरीबांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अन्याय केला आहे. त्यामुळे घरकुल यादीचा फेरसर्वे करावा अन्यतः लक्षात ठेवा ग्रामपंचायत प्रशासनाला कामकाज करु देणार नाही आसा गर्भित ईशारा माजी सभापती नानासाहेब पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु केलेल्या ठिय्या आंदोलन प्रसंगी बोलताना केले. अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर कोकणे होते.

                   घरकुलांच्या याद्या करताना ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी घोळ घातला आसल्याचा आरोप यादीतील वंचित राहीलेल्या लाभार्थ्यांनी केलेल्या संतप्त लाभार्थ्यांनी माजी सभापती नानासाहेब पवार यांच्याकडे तक्रारी केल्याने घरकुल यादीचा फेरसर्वे व्हावा या मागणीसाठी पवार यांच्या नेतृत्वाखाली काल सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, ग्रामपंचायत प्रशासनाने घरकुलाचा सर्वे करताना कार्यालयात बसुनच लाभार्थी यादी तयार केली आहे. राजकिय हेतुने प्रेरीत होवुन मर्जितील सधन लोकांना पाञ यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे गरीब व गरजु लाभार्थी घरकुलाच्या लाभापासुन वंचित राहीले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास आधिकारी यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. गोरगरीब जनतेवर अन्याय करु नका. विकासाच्या कामकाजातील धुडगुसा बद्दल आंम्ही आत्ताच बोलणार नाही. जनता काय आसेल ते पाहुन घेईल माञ घरकुलांच्या बाबतील गोरगरीबांवर झालेल्या आन्यास सहन करणार नाही. त्यामुळे घरकुलाच्या यादीचा फेरसर्वे करा अन्यतः लक्षात ठेवा तुंम्हाला ईथे बसु तर देणार नाहीच व कामकाजही करी देणार नाही असा गर्भित ईशाराही पवार यांनी यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला.

      यावेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचा खरपुस समाचार घेत पवार यांच्या मागणीला समर्थन व्यक्त केले. अण्णासाहेब दाभाडे यांनी ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांच्या कामकाजावर आक्षेप घेत त्यांची तडकाफडकि बदली करण्याची मागणी केली. भाजपाचे नारायण काळे यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यपध्दतीवर टिकेची झोड उठवत फेरसर्वे झाला नाही तर अमरण उपोषण किंवा आत्मदहनाच्या मार्गाचाही आवलंब केला जाईल आसा ईशारा दिला.

      यावेळी ग्रामविकास आधिकारी जाधव यांनी आपाञ ठरवलेल्या लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. सरपंच पती तथा आशोकचे संचालक यशवंत रणनवरे यांनी घरकुलाचा लाभ सर्वांना देण्यासाठी प्रयत्न केले जात आसुन शासकिय गट गावठाणकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आसुन राहात्या जागेवरच घर देण्याचा प्रयत्न आसल्याचे सांगितले. यावेळी सरपंच अर्चना रणनवरे यांनी निवेदन स्विकारले व फेरसर्वेसाठी नवनोंदणी सुरु करणार आसल्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. यावेळी सुप्रिया धुमाळ कृष्णा वेताळ, मुकुंद हापसे, भरत गुंजाळ, अनिता तडगे संगीता देठे मल्हारी रणवरे आप्पासाहेब नवरे आदींसह घरकुल लाभार्थी व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

 

 

घरकुलाच्या संदर्भात आजचे ठिय्या आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असून, गोर गरीब जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. घरकुलाच्या संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी नुसारच सर्वेक्षण करून समितीने यादी तयार केली आहे आणि त्याच्याशी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांचा हस्तक्षेप नाही. श्रीरामपूर तालुक्यात सर्वात जास्त पात्र लोक हे टाकळीभान मध्ये आहेत. तरी जे अपात्र ठरविण्यात आले आहे अशा लोकांना अर्ज करून पात्र करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आव्हान आम्ही आधीच घरकुल यादी वाचन करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत केलेले आहे. तरी जास्तीत जास्त जनतेला ह्या घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी कुठल्याही यादीची गरज नाही, त्यांच्यासाठी रमाई व शबरी योजने अंतर्गत घरकुल योजना सुरूच आहे.

        मयुर पटारे — राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व सदस्य, ग्रामचायत टाकळीभान

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे