चिंचाळे येथे जळीतात ७८ वर्षीय वृध्देचा जळुन मृत्यु
चिंचाळे येथे जळीतात ७८ वर्षीय वृध्देचा जळुन मृत्यु
राहुरी तालुक्यातील चिचाळे म्हातारबा ठाकार वाडी ता राहुरी येथे राहत्या घरास आग लागुन संपुर्ण संसार जळून खाक झाला असुन या छपराला लागलेल्या आगीमध्ये अनुसया भिवराम पारधे ह्या ७८ वर्षीय वृद्ध महीला जळून मयत झाल्या आहेत
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेची माहीती श्री गाडे यांनी पोलीस स्टेशनला दिली पोलीस हवालदार दुधाडे , खेमनर ,पोलीस पाटील केदारी.जानू सांगळे. ग्राप सदस्य गवारे. कामगार तलाठी कसे भाऊसाहेब.भगवाण काळे. दामु काळे. इत्यादींन घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अदिवासी समाज म्हणजे स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पा यांचे कुटुंब समजले जात असे स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील यांचा गोरगरीबांच्या संकटास धावून जाण्याचा मदत करण्याचा वारसा पुढे चालवत त्यांचे चिरंजिव जि.प.सदस्य धनराज गाडे यांनी जळीत ग्रस्त कुटुंबाला संसार उपयोगी वस्तु किराणा धान्य देऊन तात्काळ मदत केली जळीताचे तात्काळ पंचनामे करून जळीतग्रस्त कुटूंबाला शासकीय मदत देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.