हिंदू- मुस्लिम बांधवातील भाईचारा असाच कायम रहावा – शरद नवले

हिंदू- मुस्लिम बांधवातील भाईचारा असाच कायम रहावा – शरद नवले
बेलापुर -गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असुन हिंदू -मुस्लीम बांधवांचे सण उत्सव असेच एकोप्याने साजरे होत राहो अशी सदिच्छा गांवकरी मंडळाचे नेते शरद नवले यांनी व्यक्त केली गांवकरी मंडळाच्या वतीने बेलापुर येथील जामा मस्जिद व ईनामदार मस्जिद येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यातआले होते त्या वेळी बोलताना शरद नवले म्हणाले की बेलापुर गावातील मंदिर व मस्जिदची भिंत एकच आहे मुस्लिम बांधव हिंदुच्या सण उत्सवात सहभागी होतात तर हिंदु बांधवही सर्व बांधवाच्या सुख दुःखात सहभागी होतात ही गावाची परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे असेही ते म्हणाले या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई मोहसीन सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी जामा मस्जिदचे मौलाना शकील अहमद यांनी नमाज पठण केले ,या वेळी गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे जाफरभाई आतार तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे हाजी ईस्मईल शेख बाबुलाल पठाण शफीक बागवान शफीक आतार रमेश काळे किशोर खरोटे अजिज शेख सचिन अमोलीक रावसाहेब अमोलीक महेश कुऱ्हे अमोल गाढे विशाल आंबेकर समीर जहागीरदार जब्बार आतार समद टेलर सद्दाम आतार वसीम शेख अल्लाबक्ष सय्यद सलमान तांबोळी जब्बार सय्यद मुनीर बागवान जाकीर बागवान उस्मान पठाण अनवर बागवान आदिसह मुस्लिम बांधव उपस्थित होते