माहेरहून ३ लाख रूपये आणले नाहीतर तूला जिवंत मारून टाकू, अशी धमकी देऊन तरूणीला घरातून हाकलून दिले.*
*माहेरहून ३ लाख रूपये आणले नाहीतर तूला जिवंत मारून टाकू, अशी धमकी देऊन तरूणीला घरातून हाकलून दिले.*
माहेरहून तीन लाख रूपये आणले नाहीतर तूला जिवंत मारून टाकू. अशी धमकी देऊन विवाहित तरूणीला अंगावरील कपड्यानीशी घरातून बाहेर हाकलून दिले. ही घटना राहुरी तालूक्यातील कुक्कडवेढे येथे घडलीय.
सोनाली महेंद्र संसारे, वय २५ वर्षे, राहणार कुक्कडवेढे, ता. राहुरी. हल्ली राहणार नांदगाव, ता. नगर. या विवाहित तरूणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सोनाली या नांदगाव येथील तरूणीचा विवाह दोन वर्षापूर्वी राहुरी तालूक्यातील कुक्कडवेढे येथील महेंद्र संसारे या तरूणा बरोबर झाला होता. लग्न झाल्याच्या दोन महिन्या नंतर आरोपी सोनाली हिला नेहमी म्हणायचे कि, तूझ्या आई वडिलांनी लग्नात आमचा व्यवस्थित मानपान केला नाही. तसेच हूंडा देखील दिला नाही. आपल्याला घराचे काम करण्यासाठी तू तूझ्या माहेरहून तीन लाख रूपये घेऊन ये. या कारणावरुन सोनाली संसारे हिला वेळोवेळी शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच तीला उपाशी पोटी ठेऊन तीचा मानसीक छळ केला.
तू माहेरहून पैसे आणले नाहीतर तूला आम्ही जिवंत मारून टाकू. अशी धमकी देऊन, तू या घरात रहायचे नाही. असे म्हणून तिला अंगावरील कपड्यानीशी घरातून बाहेर हाकलून दिले.
तिने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी पती- महेंद्र मधुकर संसारे, सासरा- मधुकर कोंडीराम संसारे, सासू- प्रभावती मधुकर संसारे सर्व राहणार कुक्कडवेढे, ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा रजि. नं. ५७३/२०२२ भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.