डाँक्टर निर्मळ व डाँक्टर कुताळ यांचा बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने गौरव
डाँक्टर निर्मळ व डाँक्टर कुताळ यांचा बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने गौरव
बेलापूर(प्रतिनिधी )-बेलापूरचे भूमिपुत्र डॉ निर्भय नवनाथ कुताळ व डॉ अमेय मच्छीन्द्र निर्मळ यांनी नॅशनल मेडिकल कौन्सिल मार्फत घेण्यात आलेल्या एमबीबीएस एफएमजी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ निर्भय यांनी फिलिपाईन्स मध्ये तर डॉ अमेय यांनी जॉर्जिया येथे एमबीबीएस मध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.त्यानंतर भारतात सेवा देण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.या परीक्षेचा निकाल देशपातळीवर दहा ते पंधरा टक्के लागत असतो.यावर्षीही दहा टक्के निकाल लागला असून त्यामध्ये डॉ निर्भय व डॉ अमेय यांनी भरघोस यश मिळवले आहे.त्याबद्दल त्यांचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिप सदस्य शरद नवले, माजी सरपंच भरत साळुंके,खटोड पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र खटोड,उपसरपंच अभिषेक खंडागळे,डाँक्टर देविदास चोखर अजय डाकले,संतोष डाकले,पत्रकार अनिल पांडे,महेश माळवे,सुनिल नवले अनिल मुंडलीक देविदास देसाई,अनिल मुंडलीक,नवनाथ कुताळ,डॉ मच्छीन्द्र निर्मळ,प्रसाद खरात,भास्कर बंगाळ दिलीप दायमा आदि उपस्थित होते