आळंदीत माउलींच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक*
*आळंदीत माउलींच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक*
*श्री पांडुरंग तुकाराम वरखडे आणि श्री तान्हाजी आनंद राव वरखडे बैलजोडीचे मानकरी*
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2022 चा उस्ताह शिगेला पोहचणार असे चित्र आहे, सुमारें दोन वर्षाच्या कालखंडाने भरणारी वारी याच कारण आहे, अवघे काही दिवस वारी साठी बाकी आहेत, आज आळंदीत माउलींच्या पालखी सोहळ्यात
सहभागी होणाऱ्या रथाच्या मानाच्या बैलजोडी ची भव्य मिरवणूक काढण्यात आली , यावर्षी हा मान आळंदीतील वरखडे कुटुंबाला मिळाला असून फुरसुंगी येथून हि बैलजोडी खास पालखी सोहळ्या साठी श्री पांडुरंग तुकाराम वरखडे. आणि तान्हाजी आनंद राव वरखडे यांनी विकत आणली आहे , सकाळी 10 वा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ चाकण चौक येथून प्रदक्षिण मार्गे हजेरी मारूती मंदिर प्रदक्षिणा घालून आळंदी गावातून माऊली मंदीर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. वरखडे कुटुंबासोबत कुऱ्हाडे पाटिल. घुंडरे पाटील . वहिले कुटुंबीय ,रानवडे परीवार चितळकर पाटील .भोसले कुटुंबीय.आणि आळंदीकर ग्रामस्थ तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते