बालाजी देडगाव सेवा संस्थेवर श्री बालाजी शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

बालाजी देडगाव सेवा संस्थेवर श्री बालाजी शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत श्री बालाजी शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तर विरोधी श्री बालाजी शेतकरी परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. १३ जागांसाठी एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत श्री बालाजी शेतकरी विकास पॅनलने मोठ्या फरकाने आपला विजय मिळविला. त्यांचे विजयी उमेदवार असे – महेश कदम, संदीप कुटे, रामभाऊ कोकरे, रामदास तांबे, गंगासागर बनसोडे, अरुण मुंगसे, बाबासाहेब मुंगसे, संजय मुंगसे, योसेफ हिवाळे, कचरू तांबे, भिऊबाई गोयकर, सुनिता मुंगसे, रामेश्वर गोयकर.
श्री बालाजी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे, नेवासा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वरचे संचालक जनार्धन कदम, माजी सरपंच कुंडलिक मुंगसे, ज्ञानेश्वरचे माजी संचालक लक्ष्मण बनसोडे, युवा नेते चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, प्रगतशील शेतकरी बन्सी मुंगसे आदींनी केले. निवडणूक अधिकारी म्हणून जी.एम. नांगरे यांनी काम पाहिले. संस्थेचे सचिव रामकिसन तांबे यांनी त्यांना सहाय्य केले. सर्व नूतन संचालकांचे मा.खा. यशवंतराव गडाख, ना. शंकरराव गडाख, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता गडाख, माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी आ. पांडुरंग अभंग आदींनी अभिनंदन केले.