वांगी बुद्रुक येथील विहिरीचे गौडबंगाल नेमकी काय.
विहिरीसाठी खडी कोणी दान केली की काय ?
वांगी बुद्रुक येथील विहिरीचे गौडबंगाल नेमकी काय.?
विहिरीसाठी खडी कोणी दान केली की काय ?
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत विहिरीचे काम चालू झाले होते ग्रामपंचायत ठेकेदार असताना एका ठेकेदाराने गावातील काही व्यक्तींना हाताशी धरत परस्पर विहिरीचे काम चालू केले होते. गावातील नागरिकांनी आक्षेप घेत ग्रामपंचायतीने स्वतःहे काम केल्यास काम चांगल्या दर्जाचे व लवकर होईल असेच सुचवल्या नंतर ग्रामस्थांनी विहिरीचे संबंधित ठेकेदार याला दिलेले काम बंद करत, अखेर गाव तळ्यात ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच काही ग्रामस्थांची तातडीची बैठक झाल्यावर संबंधित मशीन चालकला हे विहीर खोदून देण्या पुरते ते काम ठराविक रकमेला देण्यात आले होते.
परंतु पाणी उपसा न होत असल्यामुळे ते काम मध्येच बंद करण्यात आले आहे. विहिरीसाठी रिंग (कड) बांधकाम कोणालाही देण्यात आलेले नव्हते व नाही. ग्रामसेवक उपसरपंच व काही सदस्यांना माहित नसतानाच ठराविक व्यक्तिंनी कोणत्यातरी आमिषाला बळी पडत ग्रामपंचायत विहिरीचे काम कोणत्यातरी अज्ञात ठेकेदाराला देऊन आर्थिक तडजोड करण्यात आलेली दिसून येते. संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक उपसरपंच यांना माहिती नसतानाच विहिरीजवळ रिंग बांधकाम करण्यासाठी खडी आणून टाकलेली दिसून आल्याने, अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष धनंजय माने यांनी संबंधित ग्रामसेवक पंचायत समितीचे इंजिनियर यांना याबाबत विचारणा केल्यावर वांगी बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनाच माहिती नसल्याचे सांगितले व त्यांनी वरील आरोप परत निशाणा साधत संबंधित काम कोणालाही दिले नाही तरी खडी कशी व कोणी आणून टाकली याची चौकशी होऊन संबंधित काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
अन्यथा पंचायत समिती समोर निवेदन देऊन बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे मत धनंजय माने यांनी व्यक्त केले.
1)विहीर बांधकाम कोणालाही दिले गेलेले नाही अजून तसे काही ग्रामसभेत बोलणेही झालेले नाही याबाबत मला कुठलीच कल्पना नाही मी याची चौकशी करते.
ग्रामसेविका बाचकर मॅडम.
२) *पंचायत समितीचा कुठलाही संबंध नाही संबंधित ग्रामपंचायत ठेकेदार असल्याने ग्रामसेवक व सरपंचांनाच याबाबत माहिती असेल काम कोणीही करू, काम चांगल्या प्रतीचे करून घेणार त्यात कुठलीही शंका घेऊ नका.
पंचायत समिती इंजिनियर
पिसे साहेब.
चक्क ग्रामसेवक उपसरपंच यांनाच माहिती नाही कि विहीर बांधकाम करण्यासाठी खडी कोणी आणून टाकली तेव्हा ग्रामस्थांना काय माहिती होणार अशी ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास मिळत आहे त्याच्या मागचा सूत्रधार कोण त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये चालू आहे. समोर येता येत नाही आमचे नावे सांगू नका असे ग्रामस्थांनी बोलून दाखवले म्हणजे याच्या मागे कुणीतरी व्यक्ती आहेत त्याच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.