गुन्हेगारी

संस्थाचालकांकडून ठेवीदारांना आपले ठेवलेल्या ठेव रक्कम परत मिळण्यासाठी टाळाटाळ

संस्थाचालकांकडून ठेवीदारांना आपले ठेवलेल्या ठेव रक्कम परत मिळण्यासाठी टाळाटाळ

 

 

राहुरीी येथील राहुरी तालुका राजमाता जिजाऊ संस्थाचालकांकडून ठेवीदारांना आपले ठेवलेल्या ठेव रक्कम परत मिळण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने पतसंस्थेचे ठेवीदार सहाय्यक निबंधक कार्यालय राहुरी येथे दिनांक 9 जून 2022 पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन ठेवीदारांच्या वतीने देण्यात आले आहे याबाबत दिलेल्या सहाय्यक निबंधक राहुरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजमाता जिजाऊ पतसंस्थेतील ठेवीच्या रक्कमा परत मिळाव्यात म्हणून ठेवीदारांनी वेळोवेळी अर्ज केलेले आहेत तसेच ठेवीदारांनी आपली प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा ही केलेली आहे परंतु आपणाकडून व पतसंस्थेच्या संचालकांकडून ठेवींच्या रकमा परत देणेबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही राहुरी तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांवर आपल्या कार्यालयाचे नियंत्रण असते असे असूनही आपण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संचालक मंडळाला पाठीशी घालत आहात असे ठेवीदारांच्या निदर्शनास आलेले आहे आपणाकडे संस्थेचा त्रेमासिक अहवाल वार्षिक लेखा परिक्षण अहवाल येतो सदर अहवालानुसार संस्थेची आर्थिक परिस्थिती आपल्या लक्षात येते जिजाऊ पतसंस्थेत अनेक वर्षापासून भ्रष्टाचार अनागोंदी कारभार सुरू होता हे सगळे पतसंस्थेच्या अहवालाचा अभ्यास केला असता लगेच लक्षात येते त्यामुळे जर आपण यामध्ये वेळीच लक्ष घातले असते व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले असते तर आज आमच्या ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्या नसत्या ठेवीदारांनी संचालक मंडळाच्या अनेक वेळा भेटी घेतल्या परंतु उडवाउडवीची उत्तरे देणे बरोबरच ठेवीदारांना दमबाजी ची भाषा अरेरावीची भाषा वापरली जाते ठेवीदारांनी मध्ये अनेक वयोवृद्ध आजारी ठेवीदार असून त्यांना रोजच्या गरजा दवाखाना शैक्षणिक कामासाठी मुलाबाळांच्या लग्नासाठी ठेवीची अत्यंत गरज आहे परंतु संचालकांकडून ठेवीदारांच्या ठेवी देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे ठेवींच्या रक्कमा मागण्यास गेले असता संस्थेचे ऑडिट चालू असल्याचे कारण पुढे करून ठेवी देण्यास टाळाटाळ होत आहे तरी सर्व ठेवीदारांच्या रकमा व्याजासह त्वरित मिळणेबाबत आपण कार्यवाही करावी तसेच सन 2020 ते 2021 सरकारी ऑडिट तातडीने करण्यात यावे माहे डिसेंबर 2021 पासून आजतागायत संचालकांनी वाटप केलेल्या ठेव रकमेचा हिशोब ठेवीदारांच्या नावाच्या यादी सह मिळावे इत्यादी मागण्या ठेवीदारांच्या वतीने करण्यात आलेल्या आहे याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास दिनांक 9 जून 20 22 पासून ठेवीदार आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील व याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रती सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण नाशिक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक अहमदनगर तहसीलदार राहुरी पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे सहकार मंत्री ना बाळासाहेब पाटील महाराष्ट्र नामदार प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री तथा लोकप्रतिनिधी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघ जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेसह संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांना देण्यात आले आहेत या निवेदनावर ठेवीदार कुमार डावखर, आप्पासाहेब गुंजाळ राजेंद्र जाधव रामनाथ डोके गोरक्षनाथ औटी आप्पासाहेब गुंजाळ सुयोग सरोदे ज्ञानदेव हापसे रामचंद्र कुलकर्णी रवींद्र सांगळे जगन्नाथ घाडगे सुरेश कोकाटे भाऊसाहेब तमनर ज्ञानदेव जाधव बाबासाहेब ढमढेरे कल्याण राऊत आदीं ठेवीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत,

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे