जनतेने वीस वर्षीचा केलेल्या कामचा जाब विचारावा-आयुब पठाण

जनतेने वीस वर्षीचा केलेल्या कामचा जाब विचारावा-आयुब पठाण
जनसेवा मंडळाच्या सांगता सभेच्या गेणुभाऊ तोडमल यांची अध्यक्षपदाची सुचना आयुबभाई पठाण यांनी मांडली त्यास आनुमोदन मधुकर साळवे दिले जनसेवा मंडळाचे उमेदवार श्री. दुर्गेश सुखलाल वाघ यांनी त्यांचा परिचय करून मला निवडून देऊन वार्ड क्रं 2 साठी विकास कामे करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली मा. श्री. प्रदीप पवार उपसभापती पं. स. राहुरी यांनी सभेदरम्यान आपले मनोगत व्यक्त केले व जनसेवा मंडळाचे उमेदवार दुर्गेश वाघ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले असून चांदणे मामा व यांचे गणेश त्रीमुखे यांचे आभार मानले .. आय्युबभाई पठाण यांनी ही त्यांचे मनोगत व्यक्त करताना सागितलं की समोरच्या पार्टीच्या पॉम्पलेट वर कोणत्याही नेत्या चा फोटो नाही… तर हे कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक करणार. असे भाषण करून जनसेवा मंडळाच्या सदस्यांनी गावाच्या विकासासाठी मा. ना. प्राजक्त तनपुरे यांच्या विविध विकास योजने अंतर्गत राहुरी खुर्द येथे आणलेल्या जवळ जवळ 1कोटी 50 लक्ष रू निधी मंजूर करून आणला असा उल्लेख करून समोरच्या पार्टीची चांगलाच समाचार घेतला. व सभे दरम्यान अश्विनीताई कुमावत यांनी ही त्यांच्या भाषणात सांगितले की सत्ताधारी पक्षाच्या सरपंचाकडे सर्वसामान्य महिला पाण्याच्या प्रश्नांसंबंधी त्यांना भेटायला गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली की उन्हाळा संपल्या वर पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले त्यावर सौ अश्विनीताई कुमावत म्हटल्या की धरण उशाला अन् कोरड घशाला. असा यांचा कारभार आहे… आमचा उमेदवार दुर्गेश सुकलाल वाघ हा वेल एज्युकेटेड असून त्याने M.A. Politics शिक्षण घेतलेले आहे. दरम्यान राम तोडमल यांनी ही समोरच्या पार्टीचा चांगला समाचार घेतला व दुर्गेश वाघ याला विजयी करा असे आवाहन केले.. मा. सरपंच श्री. मधुकर साळवे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .त्यांनी त्यांच्या भाषणात समोरच्या पार्टीची चांगलीच कान उघाडणी केली. कार्यक्रमा दरम्यान शब्बीरभाई देशमुख यांनी उपस्थिती लावली, मंडळाचे अध्यक्ष योगेश मालपाणी, गेणुभाऊ तोडमल, प्रदीप भाऊ पवार उपसभापती पं. स. राहुरी,भास्कर तोडमल,माजी सरपंच मधुकर साळवे, अय्युबभाई पठाण, शहुराव चांदणे बाबासाहेब गुंड, रफिकभाई शेख, सतीश पावटे, चेअरमन दिलीपराव आघाव, लक्ष्मण चोपडे भाऊ पागिरे, साहेबराव माळी, अण्णासाहेब बाचकर, राहुल पाटोळे उपाध्यक्ष जि. ग्रंथालय सेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी., ग्रा. पं. सदस्या. सौ. अश्विनीताई कुमावत, लताबाई माळी, आसफ पठाण, राम तोडमल, मुकुंद शेडगे, सामाजिक कार्यकर्ते युवराज तोडमल, मनोज गरड, भाऊसाहेब मनतोडे, अशोक मंडलिक, दिपक जाधव, गणेश त्रिमुखे, सौरभ चांदणे, बबलू कांबळे, आखिल शेख,गोरख बर्डे, अविनाश चांदणे, गोरख ससाणे, विकास बर्डे, सुदाम माळी,जालू बर्डे, अविनाश जाधव, बाळासाहेब ससाणे, जगन्नाथ धोत्रे, सागर साळवे, मनोज शिरसाठ सुरेश चांदणे अशोक चांदणे आदी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.