पुणे लोकसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत संदीप (आबा) चोरमले उतरले मैदानात

पुणे लोकसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत संदीप (आबा) चोरमले उतरले मैदानात
लोकसभेची रणधुमाळी चालू असून पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर अण्णा मोहोळ वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे तसेच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना राजकीय टक्कर देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेग आला असून यामध्ये प्रामुख्याने चौरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे.
यामध्ये ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुणे विद्यापीठांमध्ये आलेल्या संदीप (आबा) चोरमले या विद्यार्थ्याने पहिल्यांदाच पुणे विद्यापीठातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत रयत स्वाभिमानी संघटनेच्या पाठिंब्यावर व अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या पाठिंब्यावर पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत मैदानात उतरले आहे.
यामध्ये अनेक दिग्गज मैदानात असताना देखील स्वकर्तृत्व व गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे येथे काय उणे असे आपण म्हणत असताना पुण्यामध्ये नवीन काय करता येईल याचा विचार करून पुणेकरांच्या मागणीला तत्पर हजर असणारे (आबा) यांना सर्वच भागातून प्रोत्साहन देण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरातून तसेच त्यांच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क निर्माण करण्यात आबा यांना यश मिळाले आहे याच गोष्टीचे मतदारसंघात नवीन काहीतरी घडू शकणारे सतत हसतमुख व कार्यक्षम आबा यांनी निवडणूक लढवावी तसेच या भागातील जनतेच्या योग्य दिशा दाखवण्याचे काम आबा यांनी करावं अजून पुढे न्यावं यासाठी मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीला हो म्हणत आबा यांनी काल पुणे जिल्हा अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
गरीब कुटुंबातून शिक्षण घेत असलेले संदीप आबा चोरमले यांच्या दांडग्या जनसंपर्क व कर्तुत्वातून जिद्दीच्या जोरावर नागरिकांच्या मनामध्ये राज्य करणारे दिशादर्शक युवा नेतृत्व व कुठलीही राजकीय वारसा नसणारे आबा यांनी अनेक दिग्गज यांना घाम फोडला असून येणाऱ्या काळात युवा नेतृत्वाच्या हातात नक्कीच सत्ता मिळेल असे मत पुणेकरांनी व्यक्त केले.