टाकळीभान येथील स्वामी समर्थ अलंकार गृह या दुकानाचा पत्रा उचकाटून बेन्टेक्स दागिन्याची चोरी.

टाकळीभान येथील स्वामी समर्थ अलंकार गृह या दुकानाचा पत्रा उचकाटून बेन्टेक्स दागिन्याची चोरी.
टाकळीभान -प्रतिनिधी – टाकळीभान येथील स्वामी समर्थ अलंकार गृह या दुकानाचा पत्रा उचकाटून आतील सिलिंग तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील पंचवीस ते तीस हजार रुपये बेन्टेक्स दागिन्याची चोरी.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, टाकळीभान येथे अजय बिरारी यांचे स्वामी समर्थ अलंकार गृह या नावाने दुकान असून बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी अजय बिरारी हे दिवस भर दुकानाचा धंदा करून सायंकाळी दुकान बंद करून घरी आले. दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी दहा वाजता आपले दुकान उघडले असता, अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीवर चढून दुकानाचा वरचा पत्रा उचकाटून व आतील सिलिंग तोडून चोरट्यांनी शोकेसमध्ये लावलेल्या मौल्यवान बेन्टेक्स च्या अलंकाराच्या 25 ते 30 हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरीस गेल्याचे दिसून आले. याबाबत दुकानाचे मालक अजय बिरारी यांनी घडलेला प्रकार पोलिसांना कळविला असून याबाबत ते श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल करणार आहेत. यामागेही काठेड यांच्या मोबाईल शॉपी दुकानाचा पत्रा उचकाटून अशाच प्रकारची चोरी करण्यात आली होती. हा प्रकार ताजा असतानाच तोच प्रकार पुन्हा घडल्याने व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.