श्रीसाईचरित्र पारायण सोहळा व शिव महापुराण कथेस महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद,
श्रीसाईचरित्र पारायण सोहळा व शिव महापुराण कथेस महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद,
टाकळीभान येथील श्री. साई मंदिरात गुरूवार दि. २५ एप्रिल पासून सुरु झालेल्या श्री. साई चरित्र पारायण व शिवमहापुरान कथेचे महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद,
टाकळीभान येथे श्री संत साई बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री. साईबाबा मंदिरात प.पु. गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, श्री क्षेत्र देवगड संस्थान तसेच प. पु. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र सरालाबेट यांच्या कृपाशिर्वादाने श्री संत साईबाबा प्रतिष्ठाण व समस्त ग्रामस्थ टाकळीभान यांच्या सहकार्यातून श्री साईसच्चरित्र पारायण सोहळा शिवमहापुरान कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथ पारायण व्यासपीठ चालक ह.भ.प. राधेश्याम महाराज पाडांगळे टाकळीभान, मार्गदर्शक ह.भ.प. रविंद्र महाराज गांगुर्डे, ह.भ.प. संदिप महाराज जाधव यांच्या अधिपत्याखाली व रामेश्वर महाराज
आळंदी यांच्या सुमधूर वाणीतून शिवमहापुरान कथा संपन्न होत आहे.
यावेळी संदिप महाराज नरके तबला
वादक, काशिनाथ महाराज टेकाळे गायणाचार्य, गौरव महाराज झुंजे, किशोर महाराज मोटकर मृदुंगाचार्य, पसायदान मुलींचे गुरूकुल विद्यार्थीनी आळंदी हे साथसंगत करत आहेत. दि. २५ ते २ मे या दरम्यान दररोज पहाटे ५ वाजता काकडा भजन, सकाळी ७ वाजता श्रींची आरती व ग्रंथ पारायण, दुपारी आरती व त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी. ४ ते ५ हरिपाठ, सायं. ६ ते ९ शिवमहापुरान कथा तद्नंतर महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. बुधवार दि. १ रोजी दुपारी ४.०० वा. भव्य पालखी व ग्रंथ मिरवणुक होणार असून गुरूवार दि.२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. राधेश्याम महाराज यांचे काल्याचे किर्तनाने साई चरित्र पारायणाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. संत साईबाबा प्रतिष्ठाण, ग्रामस्थ, साईबाबा भक्त मंडळ, किसनगिरी बाबा भक्त मंडळ, पत्रकार संघ व भजनी मंडळ यांनी केले आहे.