टाकळीभान श्री शंभो महादेव मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी

टाकळीभान श्री शंभो महादेव मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी
टाकळीभान प्रतिनिधी: -येथील टाकळीभान सह परीसराचे ग्रामदैवत आसलेल्या पुरातन श्री शंभो महादेव मंदिरात महाशिवराञी निमित्त सालाबाद प्रमाणे जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांची वाढती गर्दी पहाता दिड टन साबुदाना खिचडी प्रसाद व पाचशे किलो केळीचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत विनोदाचार्य वाणीभुषण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे जाहीर हरी किर्तन होणार आसल्याची माहीती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्व भागातील टाकळीभान येथे पुरातन सुमारे ५०० वर्षापुर्वीचे हेंबाडपंथी शंभु महादेवाचे भव्य मंदिर आहे. टाकळीभान सह परीसराचे हे ग्रामदैवत आसल्याने भाविकांची दर्शनासाठी नेहमीच वर्दळ आसते. अनेक परदेशी पाहुणेही आवर्जुन या मनोकामना पुर्ण करणाऱ्या शंभो महादेवाच्या दर्शनाला येत आसतात. अक्षय तृतियेनंतर येणाऱ्या सोमवारी मोठा याञौत्सव साजरा करण्याची येथील प्रथा रुढ आहे तर महाशिवराञी उत्सवही भव्य प्रमाणात साजरा केला जातो.
महाशिवराञी निमित्त सकाळी ५ वाजता गंगाजलाने अभिषेक, ६ वाजता लघु रुद्राभिषेक पुजा, सकाळी ९ ते ११ या वेळेत विनोदाचार्य वाणीभुषण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर हैबती ) यांचे जाहीर हरी किर्तन, किर्तनानंतर लोकसहभागातुन जमा केलेल्या दिड टन खिचडी व ५०० किलो केळी प्रसादाचे वाटप, राञी ८ वाजता भजनाचा कार्यक्रम होवुन महाशिवराञी उत्सवाची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशितील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे अवाहन महादेव याञा कमेटी, श्रीराम पायी दिंडी सोहळा समिती, पञकार सेवा संस्था, टाकळीभान पंचक्रोशी समस्त भजनी मंडळ, ताई प्रतिष्ठाण व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे