आया बहिणींची इज्जत अब्रू ,व्यापाऱ्यांचा स्वाभिमान व्यापाऱ्यांची संपत्ती जर सुरक्षित ठेवायची असेल तर अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही
आया बहिणींची इज्जत अब्रू ,व्यापाऱ्यांचा स्वाभिमान व्यापाऱ्यांची संपत्ती जर सुरक्षित ठेवायची असेल तर अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही
श्रीरामपूर (प्रतिनिधी):- आपल्या आया बहिणींची इज्जत अब्रू ,व्यापाऱ्यांचा स्वाभिमान व्यापाऱ्यांची संपत्ती जर सुरक्षित ठेवायची असेल तर अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही आपल्याला वेळ पडली तर गुंडगिरीही करावी लागेल कायदा हातात घ्यावा लागेल आजपर्यंत खूप सहन केले खूप मोठे मन दाखवले खूप भाई भाई करत भाई चारा सांभाळला पण भोंग्यातून एकतेचा आवाज कधी येतच नसेलतर आता सागर बेग यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे आक्रमक मत पतीत पावन संघटनेचे जिल्ह्याचे सर्वेसर्वो आणि जिल्हा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष सुनील मुथा यांनी मांडत बेग यांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.
बेलापूर येथे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ झालेल्या भव्य प्रचार सभेत सुनील मुथा बोलत होते.आपल्या स्पष्ट आणि आक्रमक शैलीत केलेल्या भाषणात ते पुढे म्हणाले की,मोदींनी एव्हढे देऊनही मोदींना मुसलमांनाकडून विरोध होत असेल आणि सज्जाद नोमानी हा मौलाना जर मोदींना ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे आटे पिल्ले बंद करा असा फतवा काढत असेल तर यावर बेलापूरमधील मौलाना यांनी त्यांची भूमिका जाहीर करत त्याचा निषेध केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आता खूप झाले तुमच्या भाषेतच तुम्हालाही उत्तर द्यायची आता वेळ आली आहे असे म्हणत मुथा यांनी सागर बेग यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सागर बेग यांनी आपल्या भाषणात बेलापूर करांनी दाखवलेल्या प्रेमाची उतराई कामातून करून दाखवण्याचे वचन उपस्थित मतदारांना दिले.याप्रसंगी किर्तनकार सग्रांमबापू भंडारे व महेशजी व्यास याचे देखील भाषण झाले.
बेलापूर गावात झालेल्या या प्रचार सभेस जमलेला प्रचंड जनसमुदाय हा बेलापुरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या उमेदवारास पाठींबा देण्यासाठी जमल्याचे पहावयास मिळाले.प्रचंड घोषणाबाजी तरुणांचा अतिउत्साह आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती या सभेचे प्रमुख आकर्षण होते.सभेच्या ठिकाणी उमेदवारांचे आगमन होऊ पर्यंत तरुणांनी भाला फेक सागर बेग या घोषणेने परिसर दणाणून सोडल्याने बेग यांच्या विजयाची मुहूर्तमेढ बेलापूर गावात उभारण्यात आल्याचे संपूर्ण मतदारसंघाचे काल बघितले.