श्रीरामपूर शहरात खड्ड्याचे व धुळीचे साम्राज्य नागरिक हैराण.
श्रीरामपूर शहरात खड्ड्याचे व धुळीचे साम्राज्य नागरिक हैराण.
श्रीरामपूर शहरातून दळणवळण जास्त प्रमाणात होत असून संगमनेर नेवासा रोडवर कांदा मार्केटच्या पासून ते बुवा मंगल कार्यालयापर्यंत तसेच काळाराम मंदिर रोड वर जास्त प्रमाणात मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. छोटे- मोठे अपघात रोज होत आहेत. भाजी मार्केट तसेच पोलीस स्टेशन समोरील खड्ड्यामुळे जास्त अडथळा निर्माण होत. नगरपालिका प्रशासनात जाग कधी येणार नेमकी कोणत्या घटनेची वाट पाहत आहे.
शासकीय प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात ग्रामस्थांना पडलेला मोठा प्रश्न आहे. सध्या पावसाचे दिवस चालू असून रोड वरती धुळीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे परंतु तसे होताना दिसत नाही.
रस्त्याने रहदारी जास्त असल्याने नगरपालिका प्रशासनावर नागरिकांची तीव्र नाराजी दिसून येत आहे. यावर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.