शरद पवार गटाच्या युवासेनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी संदीप कुसळकर
शरद पवार गटाच्या युवासेनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी संदीप कुसळकर
सोनई, दि.राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवासेनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी सोनई येथील ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप कुसळकर यांची निवड करण्यात आली.
माका येथील कार्यक्रमात त्यांच्या नियुक्तीचे पत्र आज कुसळकर यांना खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सतिश थोरात सरपंच शिंगवे तुकाई, बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच भरत बेल्हेकर, सोनई शहराध्यक्ष श्रीहरी लांडे, उपाध्यक्ष विठ्ठल शेगर, सोनई सोसायटीचे माजी संचालक दिलीप शिंदे, नीलेश दळवी, हरिभाऊ वाकडे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली. नेवासा तालुक्यामध्ये संदीप कुसळकर यांचा
तरुण कार्यकर्त्यांमध्ये संपर्क मोठा असून त्यांच्यामुळे शरद पवार गटाची नेवासा तालुक्यात ताकत वाढणार आहे. कुसळकर यांचे संघटन कौशल्य चांगले असून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करून न्याय देण्यासाठी कधीही मागे न हटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. सन २०१९ झाली कोरोनाच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपले सामाजिक कार्य चालू ठेवले, समाजावर होणारे अन्याय अत्याचार यांच्या विरोधात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलन उपोषण करून त्यांना न्याय द्यायचे काम केले