वाहनांचा जोरदार अपघात; पाचेगाव येथील एक ठार, दोन गंभीर जखमी

वडाळ्या जवळ वाहनांचा जोरदार अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी
सोनई अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वडाळा बहिरोबाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
संभाजीनगर कडुन अहिल्यानगर कडे जात असलेला आयशर टेम्पो (क्रमांक MH04 EP 0377) व अ.नगर कडुन संभाजीनगर कडे जात असलेल्या स्विफ्ट गाडी (क्रमांक MH12 8255) यांच्यात जोरदार धडक होऊन गोरक्षनाथ भानुदास तुवर (रा. पाचेगाव तालुका नेवासा) या भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून स्विप्टमधील एकनाथ मतकर व आणखी एक प्रवासी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने आहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक आशिष शेळके, ज्ञानेश्वर माळवे,अण्णा कारखिले, नितिन भागवत, आदेश घोडके, साईनाथ सुपारे, अजय ठुबे व वाहन चालक कर्पे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून बाजुला केले.वाहतुक सुरळीत चालू केली याप्रकरणी शिंगणापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेने पाचेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.